वृक्षलागवड कागदावरच; प्रत्यक्षात झाडेच नाहीत, 50 टक्के दिसणेही दुर्मिळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2015-16 पासून कोटींची वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. "जलयुक्त शिवार अभियाना'प्रमाणेच ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाते. मात्र, "जलयुक्त'प्रमाणेच या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी राहत असून, प्रत्येक जिल्ह्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट तर कसेबसे विविध विभागांच्या माध्यमातून पूर्ण होते. मात्र, त्यापैकी किती झाडे जगतात, हा प्रश्‍नच आहे. उद्दिष्ट व प्रत्यक्ष लागवड यात सकारात्मक तफावत असली तरी प्रत्यक्ष झाडे जगविण्याचे प्रमाण 65 ते 70 टक्के आहे.

जळगाव : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2015-16 पासून कोटींची वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. "जलयुक्त शिवार अभियाना'प्रमाणेच ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जाते. मात्र, "जलयुक्त'प्रमाणेच या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी राहत असून, प्रत्येक जिल्ह्याला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट तर कसेबसे विविध विभागांच्या माध्यमातून पूर्ण होते. मात्र, त्यापैकी किती झाडे जगतात, हा प्रश्‍नच आहे. उद्दिष्ट व प्रत्यक्ष लागवड यात सकारात्मक तफावत असली तरी प्रत्यक्ष झाडे जगविण्याचे प्रमाण 65 ते 70 टक्के आहे. विशेष म्हणजे 70 टक्के वृक्ष जगविण्याचा हा दावा प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण 50 टक्केच असल्याचे दिसते. त्यामुळे वृक्षलागवड उद्दिष्टापुरती केवळ कागदावर दिसते, प्रत्यक्ष जागेवर झाडांचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे. 

जळगाव जिल्ह्यात 2015-16 मध्ये 12 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. मात्र, 15 लाख 17 हजार वृक्ष लावण्यात आले. प्रत्यक्षात 11 लाख 67 हजार वृक्ष जगले, तर 2016-17 मध्ये 20 लाख उद्दिष्ट असताना 22 लाख 61 हजार वृक्ष लावण्यात आले. पैकी 17 लाख 81 हजार वृक्ष जगविण्यात प्रशासनाला यश आले. 

ग्रामपंचायतींना उद्दिष्ट 
जिल्ह्यातील 1152 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 325 झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. त्यात तीन लाख 74 हजार 400 झाडे लावण्यात आली. यंदा प्रत्येक ग्रामपंचायतीला 1125 झाडे लावण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे 12 लाख 96 हजार वृक्षलागवड ग्रामपंचायती करणार आहेत. जिल्ह्याला यंदा बेचाळीस लाख 43 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. जळगाव महापालिका त्यापैकी पंधरा हजार झाडे लावणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स, इनरव्हील क्‍लब, सर्व शासकीय कार्यालयांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी रोपे तयार करणे सुरू आहे. 
 
यंदा (2018) दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 
वन विभाग : 20 लाख 68 हजार 600 
सामाजिक वनीकरण : 6 लाख 
ग्रामपंचायती : 12 लाख 56 हजार 
इतर शासकीय यंत्रणा : 31 लाख 18 हजार 400 
एकूण : 42 लाख 43 हजार 
 

Web Title: marathi news jalgaon tree plantation