झाड जेथे, पाणी तेथे ः झाडांसाठी पाणपोई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "देवा मी तुझा सोनार' या संघटनेतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज व देहदानी सरस्वती रामकृष्ण पातोंडेकर यांच्या स्मरणार्थ "झाड जेथे, पाणी तेथे' या उपक्रमातून श्रीराम नवमीपासून शहरात "झाडांसाठी पाणपोई' सुरू करण्यात आली आहे.

जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "देवा मी तुझा सोनार' या संघटनेतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज व देहदानी सरस्वती रामकृष्ण पातोंडेकर यांच्या स्मरणार्थ "झाड जेथे, पाणी तेथे' या उपक्रमातून श्रीराम नवमीपासून शहरात "झाडांसाठी पाणपोई' सुरू करण्यात आली आहे. यासाठी तीनचाकी सायकलींच्या दोन आकर्षक गाड्या तयार केल्या असून, यात प्रत्येकी तीनशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. 
गाडीवर "पर्यावरण ऱ्हासाची कहाणी- नाही देत कोणी झाडांना पाणी', "झाडांना पाणी द्या...झाडे जगवा..बघता काय..सामील व्हा..' असा मोहीम व्यापक करणारा पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आला आहे. दोन सत्रांमध्ये झाडांना पाणी वाटप सुरू असून, सकाळच्या सत्रात सकाळी सहा ते दहा व दुपारच्या सत्रात चार ते सायंकाळी सात या वेळेत शहरातून झाडांना पाणी देणे सुरू आहे. यात केवळ झाडांना पाणी देणे इतकाच उद्देश नाही, तर झाडाभोवती असलेले तण काढून मगच त्याला पाणी दिले जात आहे. जेणे करून झाड जगलेच पाहिजे. सद्यःस्थितीत मोहाडी रोड, परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना दररोज पाणी देणे सुरू आहे. या उपक्रमात झाडांची मोजदाद करणे, लेबलिंग करणे, त्यांची वर्गवारी करून जास्तीत जास्त लक्ष पुरविणे, असा एकत्रित समावेश आहे. 

"निसर्गाशी सुसंगत जोडलेले राहा' असा संदेश प्रचलित आहे. मानवाला जर आनंदी आणि समाधानी राहायचे असेल, तर निसर्गाशी मैत्री करणे गरजेचे आहे. कारण जगातील जेवढी जैवविविधता जास्त तेवढा जगण्यातील आनंद आणि समाधान जास्त, हा निसर्ग नियम आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. 
- किरण पातोंडेकर, संचालक, पातोंडेकर ज्वेलर्स, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon tree plantation water suply patondekar