पाळधी बायपासवर दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार 

पाळधी बायपासवर दोन ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार 

जळगाव ः पाळधी बायपासवर दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होवून एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी आहे. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने जखमींना उपचारासाठी रूग्णालयात आणण्यासाठी उशीर झाला होत. जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. 
मालेगावहून छत्तीसगढकडे कांदे भरून जाणारा ट्रक (क्र. सीजे- 07, केडब्ल्यू 8739) व अकोल्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक (एमएच 48, टी. 8784) यांची पाळधी बायपासवर समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही ट्रकच्या समोरील भाग पुर्णपणे दाबला गेला आहे. यात मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधील चालक मो. इस्लाम खान अब्दुल सबाम (रा. गिरडी, ता. तुलसीपूर, मध्यप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत क्‍लिन्नर म्हणून असलेला मुलगा मो. नासीर खान इस्लाम खान हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुसऱ्या ट्रकमधील बाप- लेक अरविंदकुमार राय (वय 45) व धनंजयकुमार राय (वय 21) राहणार भिलाई (छत्तीसगढ) हे देखील गंभीर जखमी आहेत. तिघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com