सुसाट डंपरचालकाची भर बाजारात वृद्धाला धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

जळगाव : शहरातील बाजारपेठेत चौबे शाळेकडून सुभाषचौकाकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने पादचारी वृद्धास धडक दिल्याची घटना पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावरुन वाळूचा डंपर जाण्याला पोलिसदलासह परिवहन व महसूल विभागाची सूट असल्याखेरीज तो जाऊच शकत नाही, त्यातूनच हा प्रकार घडल्याने संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन चालकाला झोडपून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

जळगाव : शहरातील बाजारपेठेत चौबे शाळेकडून सुभाषचौकाकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने पादचारी वृद्धास धडक दिल्याची घटना पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावरुन वाळूचा डंपर जाण्याला पोलिसदलासह परिवहन व महसूल विभागाची सूट असल्याखेरीज तो जाऊच शकत नाही, त्यातूनच हा प्रकार घडल्याने संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन चालकाला झोडपून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार, जुने जळगावातील गोपाळपुऱ्यातील रहिवासी रामदास झिपा भील (वय-75) हे गांधी मार्केटच्या दिशेने पायी जात होते.याच वेळी शिवाजीरोडकडून सुभाषचौकाकडे वाळूने गच्च भरलेल्या (एमएच.19 बीजी2313 ) सुसाट डंपर चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या रामदास भील यांना जोरदार धडक दिली. डंपरच्या धडकेत रामदास भिल खाली कोसळल्याने डंपरचे पुढील चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायाच्या पंजाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. बाजारातील व्यवसायीक आणि नागरीकांनी जखमी वृद्धाला तातडीने रिक्षातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगीतले. मुख्य बाजारातून अवजड वाहतूकीला बंदी असतांना डंपर चालकांनाच मात्र पोलिसांनी पुर्ण मुभा दिलेली आहे. हद्द असणारे पोलिस ठाणे आणि वाहतूक पोलिसांच्या आर्थीक साटे लोटे असल्या शिवाय वाळू डंपर मुख्य शहरात शिरुच शकत नाही अशी माहिती समोर आली आहे. 

डंपर फोडून चालकाला झोडपले 
अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक करुन डंपरच्या काचा फोडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता, दगडफेक होत असल्याने डंपर वरील चालक स्वप्नील भिमराव धनगर (रा.फेकरी)याने गर्दींचा गैरफायदा घेवून पळ काढला मात्र, तरी त्याला शोधुन काढून नागरीकांनी यथेच्छ झोडपून काढले. दरम्यान पोलिसांनी नेहमी प्रमाणे कर्तव्य बजावत घटनास्थळी धाव घेतली पब्लीक मार होत असलेल्या डंपर चालकाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. 

पोलिसांकडून डंपर उशीराने ताब्यात 
डंपरवर दगडफेक झाल्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेले शनिपेठ पोलिस स्टेशनमधील कर्मचारी दहा मिनीटांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर डंपर हे शिवाजी रोडवरील रस्त्याच्या मधोमध उभे असल्याने याठिकाणी वाहतुक खोळंबली होती. दरम्यान वाळू माफियाने पाठवलेल्या खबऱ्याने डंपर सुरु करुन ते पोलिस स्टेशनमध्ये न नेता थेट दुसऱ्या अन्य ठिकाणी पळवून नेला होता. त्यानंतर दुपारी उशीरा डंपर पोलिसांनी ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या आवारात लावले. या घटने प्रकरणी डंपर मालक ललित चौधरी (रा. जुने जळगाव) व चालक स्वप्निल धनगर (रा. फेकरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

Web Title: marathi news jalgaon truck accident