महामार्गावर ट्रक समोरासमोर धडक; दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

जळगाव : शहराकडून भुसावळकडे सिमेंटच्या गोणी घेवून जात असलेला आणि नागपूरकडून सुरतकडे कोळसा घेवून जाणाऱ्या ट्रकची तरसोद फाट्याजनीक हॉटेल अमर पंजाब येथे समोरासमोर धडक झाली. यात दोघांचा जागीच मृत्य झाला तर, अन्य तिघे जखमी आहेत. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूरकडून सुरतकडे जाणारा आणि जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकचा महामार्गावरील खड्डा चुकविताना समोरासमोर धडक झाली. यात एका ट्रकवरील हमाल पोपट मोहन सोनार (वय48, रा. शाहुनगर) हा जागीच ठार झाला. तर चालक गयास पिंजारी यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात दोन्ही ट्रकवरील तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पावणे आठ वाजता घडली. 

Web Title: marathi news jalgaon truck accident 2 daith