उमवि'वर आजपासून "बहिणाईं'ची मोहोर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा उद्या (ता. 11) नामविस्तार होत असून, "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव' या नावाने ओळखले जाणार आहे. या नामविस्तारानिमित्त आनंद सोहळा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या उपलब्धतेनुसार लवकरच घेतला जाणार आहे. 

जुलै महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव' असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले होते. 11 ऑगस्टला हा नामविस्तार करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या काळात केली होती. विद्यापीठाला आज नामविस्ताराची अधिसूचना प्राप्त झाली असून, त्यानुसार उद्यापासून (ता. 11) कवयित्री "बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव' असा नामविस्तार करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार उद्यापासून नामविस्तार अमलात येणार आहे. मात्र या नामविस्ताराचा आनंद सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपलब्ध तारखेनुसार लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती कुलसचिव भ. भा. पाटील यांनी दिली. 
 
प्रवेशद्वारावर नाव 
"उमवि'ला "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव' असे नाव देण्याचे जाहीर झाल्यानंतर विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याच्या तयारीस वेग आला होता. दरम्यान, आज ही तयारी पूर्णत्वास आली असून, विद्यापीठाच्या प्रवेशद्वावरील नाव देखील बदलण्यात आले आहे. यासोबतच विद्यापीठाच्या आतील रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. 

Web Title: marathi news jalgaon ubivercity bahinabai name