उद्योजकाला घातला 41 लाखांचा गंडा 

उद्योजकाला घातला 41 लाखांचा गंडा 

जळगाव : शहरातील स्थानिक कंपनीच्या युकेतील (युनायटेड किंगडम) एका कंपनीशी झालेल्या करारांतर्गत आर्थिक व्यवहारातील सुमारे 41 लाखांची रक्कम सायबर दरोडेखोरांनी लुटून जळगावच्या उद्योजकाला गंडा घातला. संबंधितांनी युकेतील कंपनीचे बनावट खाते तयार करून परस्पर ही रक्कम या दरोडेखोरांनी लाटली. तथापि, आपण जमा केलेली रक्कम संबंधित कंपनीला मिळाली नसल्याचे लक्षात आल्याने जळगावातील उद्योजकाने या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

येथील स्टार कुलर्स ऍण्ड कंडेन्सर कंपनीचे संचालक सुशीलकुमार ओमकुमार असोपा (वय 55) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक स्टार कुलर्स आणि युकेची कंपनी स्टार फ्रॉस्ट या दोघांमध्ये उत्पादन, तांत्रिक मदतीसह प्रचलित डिझाईन खरेदीच्या व्यवहारासंदर्भात करार झाला होता. ठरलेल्या करारानुसार, स्टार कुलर्सकडून त्यांच्या ई- मेल (sushilasopa@starcooer.co.in) खात्यावरून स्टार फ्रॉस्ट कंपनीच्या (adouglas@starref.co.uk) खात्यावर 7 ते 16 ऑगस्टदरम्यान ऑर्डर व इतर देवाणघेवाणीचे संभाषण करण्यात येत होते. मात्र, हॅकर्सनी स्टार कुलर्सचा ई-मेल हॅक करून झालेल्या व्यवहारावर नजर ठेवली व युकेच्या स्टार फ्रॉस्ट कंपनीशी मिळतेजुळते नवे ई-मेल खाते (adouglas@star-ref.co.uk) तयार करण्यात केले. त्याद्वारे या सायबर दरोडेखोरांनी संपर्क साधून कंपनीला स्टार फ्रॉस्टला (युके) देणे असलेली 46 लाख 11 हजार 800 ब्रिटन पौंड रक्कम स्वतःच्या बनावट बॅंक खात्यात वर्ग करून घेतली. 
 
बॅंकेला आली शंका 
स्टार कुलर्स कंपनीतर्फे युकेच्या स्टार फ्रॉस्ट या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या खात्यात 46 लाख 11 हजार 800 ब्रिटन पौंड (भारतीय चलनात 41 लाख 28 हजार 448 रुपये) ही रक्कम 15 ऑगस्टला वर्ग करण्यात आली. ऍक्‍सिस बॅंकेच्या जळगाव शाखेतून 24 ऑगस्टला सुशीलकुमार असोपा यांना संपर्क करून झालेल्या व्यवहाराबाबत खात्री करण्याची सूचना आली. त्यानुसार त्यांनी खात्री केल्यावर नेमक्‍या कंपनीच्या खात्यात व त्यांना निर्धारित रक्कम मिळाली नसल्याचे कळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com