पुजाचा आविष्कार : सौरऊर्जेवरील हायजेनिक ग्रीन डस्टबिन प्रोजेक्‍ट सर्वोत्तम 

puja chohan
puja chohan

जळगाव : केबीसी एनएमयू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुजा चौहान हिने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. यामुळे तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. 


विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण कल्पना आणण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी दरवर्षी विद्यापीठातर्फे आयोजित केली जाते. या स्पर्धेत एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत विभागातील विद्यार्थ्यानी पूजा चौहान हिला पदव्युत्तर श्रेणीतील अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या विभागीय विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. आता 28 ते 31 जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखवत, विभाग प्रमुख डॉ. पी. जे. शाह, प्रकल्प मार्गदर्शक डॉ. पी. वि. ठाकरे आदींनी अभिनंदन केले. 


काय आहे प्रोजेक्‍ट 
पुजा चौहान हिने सौरऊर्जेवर चालणारे हायजेनिक ग्रीन डस्टबिन हा प्रोजेक्‍ट सादर केला होता. कचऱ्यामुळे होणाऱ्या रोगांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा उपयोग करून हि वाढती रोगराई रोखता येऊ शकते. "सोलर पॉवर बेस्ड हायजिनीक ग्रीन डस्टबिन" ही पूर्णपणे ऑटोमॅटिक असून सौरऊर्जेवर काम करते. सर्वप्रथम एखादी व्यक्ती कचरा टाकण्यास डस्टबिन समोर आल्यावर डस्टबिनचे झाकण सेन्सॉरमुळे आपोआप उघडते. त्यात कचरा टाकल्यास तो कॉम्प्रेसरच्या मदतीने दाबला जाईल. जेणेकरून कचराकुंडीची क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच कचऱ्याची पातळी 50 आणि 100 टक्‍के वर पोहोचल्यास त्याची माहिती एल.सी.डी. स्क्रीनवर दर्शवली जाईल. तसेच शंभर टक्‍के पातळीपर्यंत भरल्यास त्याचा एस.एम.एस. जी.एस.एम. प्रणालीद्वारे मनपा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचेल. कचऱ्यामुळे होणारे डास व दुर्गंधी नष्ट करण्यासाठी "हिट व रूम फ्रेशनर'चा वापर केलेला आहे. जे आपोआप कचरा टाकल्यानंतर डस्टबीनच्या आत स्प्रे होत राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com