आदिवासी अकादमी, सायन्स पार्क अजेंड्यावर; कुलगुरू पाटील यांचा दोन वर्ष कार्यकाळ पूर्ण 

आदिवासी अकादमी, सायन्स पार्क अजेंड्यावर; कुलगुरू पाटील यांचा दोन वर्ष कार्यकाळ पूर्ण 

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहावे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांची 25 ऑक्‍टोबर 2016 मध्ये राज्यपालांनी निवड केली. त्यांच्या नियुक्तीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थी हितासह अनेक प्रशासकीय निर्णय घेत सकारात्मक बदल घडविले. यात पीएच.डी घोषणापत्र, विद्यार्थी सुविधा केंद्र, विद्यापीठ प्राधिकरण निवडणुका, मुदतीच्या आत परीक्षांचे निकाल, सामंजस्य करार, एक पाऊल डिजिटल साक्षरतेकडे उपक्रम सुरू केले. तर येत्या वर्षात आदिवासी अकादमी, सायन्स पार्क सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते "कुलगुरूंच्या' अजेंड्यावर आहेत. 

सन 2016 मध्ये कुलगुरूंनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्यार्थी हित लक्षात घेऊन उपक्रम सुरू केले. यात संशोधनावर अधिक भर देण्यात आला. सुरवातीला कुलगुरू विद्यार्थी संवाद पर्व सुरू करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना थेट आपल्या समस्या, अडचणी मांडता आल्या. यानंतर कुलगुरू-प्राचार्य संवाद पर्व सुरू करण्यात आला. यात प्राचार्यांना देखील आपल्या समस्या थेट कुलगुरूंकडे मांडता आल्याने अनेक अडचणी दूर झाल्या. क्‍यूएसद्वारा भारतातील सर्वोत्तम 75 विद्यापीठांच्या जाहीर झालेल्या यादीत कबचौ उमवि हे 56 व्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी ठरले. 
... 
निवडणुकांमध्ये अव्वल 
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यापासून सात महिन्यांच्या आत विद्यापीठ प्राधिकरण निवडणुका पूर्ण करणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे महाराष्ट्रात अव्वल ठरले. यासोबतच एम.एस्सी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने यशस्वी राबविणारे कबचौ उमवि हे पहिले विद्यापीठ ठरले. तसेच मुदतीच्या आत म्हणजेच 93 टक्के परीक्षांचे निकाल हे तीस दिवसात तर उर्वरित सात टक्के निकाल 45 दिवसात लावणारे महाराष्ट्रातील हे अग्रेसर विद्यापीठ ठरले. 
 
बहिणाबाईंचे नाव अभिमानास्पद 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 11 ऑगस्ट 2018 ला "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सवही घेण्यात आला. ही विद्यापीठ व खानदेशसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 
 
संशोधन हितासाठी सामंजस्य करार 
विद्यापीठाने यापूर्वी अभियांत्रिकी, फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विषयांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन मूल्यमापनाचे पाऊल उचलले होते आता बी.एस्सी आणि बी.एच्या उत्तरपत्रिकांचे देखील मूल्यमापन हे ऑनलाइन करण्यात आले आहे. यासोबतच विद्यापीठ प्रशाळांसाठी दीर्घोत्तरी परीक्षा, शहीद जवानांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, श्‍यामची आई पुस्तकाचे उर्दू अनुवाद, उन्नत अभिवृद्धी योजनेत पदोन्नती, लोककला अकादमी, जैवविविधता सूची, स्वच्छता अभियान, पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज तर बारा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 
 
आदिवासी अकादमीचे स्वप्न 
पुणे, मुंबई, नाशिक याठिकाणाप्रमाणेच जळगावात देखील सायन्स पार्क असावे यासाठी कुलगुरूंचे प्रयत्न सुरू आहे. यासोबतच नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी स्थापन करण्याचे कुलगुरू पाटलांचे स्वप्न असून राज्य शासनाने यासाठी 25 एकर जागा दिली आहे. नंदुरबार जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून अकादमीच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना विकसित करण्यासाठी विद्यापीठाला इनक्‍युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. 
 
सोलर प्रकल्पातून लाखोंची बचत 
विद्यापीठाचे बिल हे दरमहा 25 ते 26 लाख रुपये येत असते. हे बिल येऊ नये यासाठी सर्व इमारतींवर सोलर पॅनल बसवून मिळावे यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे दरमहा लाखोची बचत होईल. यासोबतच दोन वसतिगृह, बंधारा यांसाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com