उमवि नामविस्ताराचा सोहळा अखेर स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित नामविस्ताराचा सोहळा अखेर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबरोबरच रद्द झाला आहे. असे असले तरी शनिवारपासून (ता. 11) विद्यापीठ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे. तर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नामविस्तार आनंद सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अनेक वर्षांच्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विद्यापीठाच्या नामविस्तारास मंजुरी देण्यात येऊन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणाही केली. दोन दिवसांपूर्वीच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा 11 तारखेलाच होणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्‍चित होत नसल्याने हा सोहळा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. 
असे असले तरी शनिवारपासून विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण होणार असून या नव्या नावाने विद्यापीठ ओळखले जाणार आहे. 
 
लवकरच "आनंद' सोहळा 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा सोहळा तूर्तास रद्द झाला असला तरी तो लवकरच आयोजित केला जाणार आहे. त्यावेळी होणारा जाहीर कार्यक्रम उमवि नामविस्तार "आनंद' सोहळा म्हणून साजरा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 
Web Title: marathi news jalgaon univercity namkaransohda