विद्यापीठ काढणार सर्व विद्यार्थ्यांचा अपघात विमा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

ळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था व विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळेत प्रवेशीत 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. 

ळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था व विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळेत प्रवेशीत 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. 
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध अर्थसहाय्याच्या योजना राबविल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्याचा दुर्दैवाने अपघात होऊन मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या वारसांना 2 लाख 40 हजार रुपये व कुलगुरू वैद्यकीय निधी योजनेतून 10 हजार रुपये आर्थिक मदत केली जात होती. 
शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यार्थ्याचा दुर्दैवाने अपघात होऊन मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या वारसांना 5 लाख रुपये व कुलगुरू वैद्यकीय निधी योजनेतून 10 हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. 
याबाबतचा दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. दि न्यू इंडिया इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक एस. डी. कमलाकर, सहाय्यक प्रबंधक, पंकज सोनी, एजंट, प्रल्हाद पाटील यांना विमा उतरविण्यासाठीच्या हप्त्याची रक्कम 24 लाख 97 हजार चाळीस रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कुलसचिव भ. भा. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सत्यजित साळवे, सहायक कुलसचिव, एन. जी. पाटील आदी उपस्थित होते. 

विद्यापीठ विद्यार्थी हिताच्या योजना राबविण्यासाठी नेहमी आग्रही आहे. मागील काळातील अपघाती विम्याची रक्‍कम 2 लाख 50 हजार रुपयांवरून 5 लाख रुपये केल्याने दुर्दैवाने अपघात झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नक्‍कीच या बाबीचा फायदा होईल यात शंका नाही. 
-पी. पी. माहुलीकर, प्र कुलगुरू, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon univercity student accident policy