Video खासदार उन्मेष पाटील का चिडले बॅंक अधिकाऱ्यांवर... 

unmesh patil
unmesh patil

कजगाव (ता. भडगाव) ः येथील सेंट्रल बॅंकेत खासदार उन्मेश पाटील यांनी आज अचानक भेट देऊन बॅंकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. बॅंक ग्राहकांच्या असलेल्या अडचणींबाबत जळगाव येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बॅंकेच्या कामकाजात आठ दिवसात सुरळीतता न आणल्यास आपण स्वतः ऑइलचा डबा आणुन काळे फासणार असा इशाराच खासदार पाटील यांनी दिला. 


सेंट्रल बॅंकेत बॅंक ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात नेटची अडचण नित्याचीच झाली आहे. तसेच विविध कर्ज प्रकरणांसाठी ग्राहकांना बॅंकेकडून फिरवाफिरव केली जाते. कृषी व मुद्रांलोनची दखल घेतली जात नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पेंशनर, विविध योजनेच्या महिला लाभार्थी यांना देखील नेट बंद राहत असल्याने तासन्‌तास बसावे लागते. या अडीअडचणींबाबत खासदार उन्मेष पाटील यांना नागरिकांनी बॅंकेकडून येत असलेल्या अडचणींबाबत तक्रार केल्या होत्या. या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने खासदार पाटील यांनी आज (ता.17) दुपारी बॅंकेस भेट देऊन अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी धैर्यशील पाटील, रवींद्र पाटील, विनोद हिरे, विनायक पाटील, पप्पू पाटील, अनिस मनियार, संजय महाजन, स्वप्नील पाटील, गौरव पवार, संदेश पाटील, तेजस वाणी तसेच जेष्ठ खातेदार उपस्थित होते. 

आठ दिवसांची दिली मुदत 
सेंट्रल बॅंकेचे रीजनल मॅनेजर शशी भुषण सिंग यांच्याशी चर्चा करून बॅंकेत येत असलेल्या अडचणीबाबत माहिती देत विविध कर्ज प्रकरणात तसेच मुद्रांलोन प्रकरणात बॅंकेकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. योग्य त्या फाईल मुद्रांलोन वा इतर कर्ज प्रकरण मार्गी लावावेत. तसेच कजगाव बॅंकेची नेट सुविधा सुरळीत करत या ठिकाणी पर्यायी नेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. इतर अनेक अडचणी बाबतीत रीजनल मॅनेजर यांच्याशी खासदार पाटील यांनी चर्चा करत येत्या आठ दिवसात सुरळीतता न आल्यास स्वतः ऑइलचा डबा आणुन काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com