उपायुक्त, आरोग्याधिकारी यांच्यात खडाजंगी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

उपायुक्त, आरोग्याधिकारी यांच्यात खडाजंगी 

उपायुक्त, आरोग्याधिकारी यांच्यात खडाजंगी 

जळगाव : सार्वजनिक शौचालयांच्या मक्ता देण्यासाठी महिला बचत गट व घनकचरा प्रकल्पाच्या फाइलवरून आरोग्याधिकारी व उपायुक्त यांच्यात आज चांगलीच खडाजंगी झाली. यावर आरोग्याधिकारी उदय पाटील उपायुक्त खोसे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आरोग्याधिकारी पद सोडण्याच्या तयारीत आहेत. 
उपायुक्त खोसे यांच्या दालनात आज दुपारी दोघांमध्ये वाद झाला. घनकचरा प्रकल्प व सार्वजनिक शौचालयांचा साफसफाईचा मक्ता देण्यासंदर्भात महिला बचत गटांच्या फायलीवर त्रुटी काढून अडवणूक केल्याबाबत उपायुक्त व आरोग्याधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. महापालिकेचे हित लक्षात न घेता उपायुक्त फाईलची अडवणूक करत आहेत, असा आरोप आरोग्याधिकारी पाटील यांनी केला. तसेच महिला बचत गटाची एक महिन्यापासून फाइल टेबलावर विनाकारण प्रलंबित आहे. याला कंटाळून आरोग्याधिकारी पद सोडण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. याबाबत उपायुक्त खोसे यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत घडलेल्या घटना ही प्रशासकीय कामाचा एक भाग असून, फायलींची कुठल्याच प्रकारे अडवणूक केली जात नाही, असे सांगितले. 

चौकट 
बदलीसाठी फायलींची अडवणूक 
उपायुक्त खोसे यांना बदली मिळावी, यासाठी मुद्दाम फाइलची अडवणुकीचा प्रकार केला जात आहे. विभागप्रमुखांना चौकशीचा धाक दाखवून ते "ब्लॅकमेल' करण्याचा प्रकार करीत आहेत, असा आरोप आरोग्याधिकारी पाटील यांनी केला आहे. 

Web Title: marathi news jalgaon upayukta

टॅग्स