पुस्तकांच्या मैत्रीचा "वाचन कट्टा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

जळगाव : केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने शहरातील डॉ. अविनाश आचार्य प्राथमिक विद्यालयात "वाचन कट्टा' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दररोज विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास आपल्या आवडीची पुस्तके वाचायला मिळणार आहे. 

साहित्य माणसाला समृद्ध करते. आपण जे प्रत्यक्षात पाहू शकत नाही. ते विश्व आपण पुस्तकांच्या माध्यमातून पाहू शकतो. पुस्तक हे चालते बोलते व्यासपीठ आहे. पुस्तके सुख, दुःखात मित्राप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पुस्तकांशी मैत्री करणे फायदेशीर ठरते यासाठी डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात मोकळ्या मैदानावर "वाचन कट्टा' हा उपक्रम उद्या (ता. 1) पासून सुरू करण्यात येत आहे. यात कट्ट्यावर विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची सुमारे तीनशे पुस्तके ठेवण्यात येणार आहे. 
 
या पुस्तकांचा राहील समावेश 

"वाचन कट्टयात' अभ्यासक्रमासह गोष्टी, कविता, कादंबरी, चिंटू, बालमित्र, चित्रप्रदर्शन तसेच दररोजचे वर्तमानपत्र याठिकाणी वाचनासाठी ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना यातून नवीन माहिती देखील मिळेल, त्यांचे मनोरंजनही व वाचनाची गोडी देखील निर्माण होईल. 
 
आवडेल ते वाचा.... 
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन या तासिकेला या कट्ट्यावर पाठविण्यात येईल. यानंतर विद्यार्थ्यांना त्याठिकाणी आवडेल ते पुस्तक व कुठेही बसून ते मनसोक्त वाचता येईल. 
 
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी "वाचन कट्टा' सुरू करण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. 
- योगिता पाटील (मुख्याध्यापिका)

Web Title: marathi news jalgaon vachan katta friendship