वाघूर, अटलांटासह पाच प्रकरणात "एसआयटी' चौकशी 

वाघूर, अटलांटासह पाच प्रकरणात "एसआयटी' चौकशी 

जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. माजी नगरसेवक (कै.) नरेंद्र पाटील यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. 
तत्कालीन जळगाव नगरपालिका असताना वाघूर पाणीपुरवठा योजना, जळगाव शहरातील रस्ते तयार करण्यासाठी अटलांटा कंपनीला दिलेला मक्ता, जिल्हा बॅंकेतर्फे नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आय.बी.पी. खाते, तसेच जळगाव विमानतळ उभारणी या सर्व प्रकरणात तब्बल 650 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार माजी नगरसेवक (कै.) नरेंद्र भास्कर पाटील यांनी पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी होत नसल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 

विजय पाटील झाले फिर्यादी 
यादरम्यान फिर्यादी नरेंद्र पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे बंधू ऍड. विजय पाटील यांनी या प्रकरणाची आपल्याला माहिती असल्याने फिर्यादी म्हणून आपले नाव घ्यावे, अशी खंडपीठाला विनंती केली होती. त्यानुसार त्यांची विनंती ग्राह्य धरण्यात आली. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या द्विसदस्यीय पीठासमोर यासंदर्भात आज सुनावणी झाली. शासनातर्फे या प्रकरणांची चौकशी सांगण्यात आले होते. मात्र खंडपीठाने या प्रकरणी फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
..यांच्यामार्फत होणार चौकशी 
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नियुक्त करून चौकशी करावी, यात दोन आयपीएस दर्जाचे, एक निवृत्त अधिकारी, जळगावचे पोलिस अधीक्षक, नाबार्डचे एक अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेच्या एका अधिकाऱ्यांचा समावेश असावा, असे आदेश दिले आहेत. शासनाने तीन आठवड्यात ही समिती नियुक्त करावी आणि समितीने संपूर्ण चौकशी करून लवकरात लवकर अहवाल द्यावा, असेही म्हटले आहे. या प्रकरणात पालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षांसह अधिकारी व 85 नगरसेवकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com