..तर जळगावकरांवर पाणीकपातीचे संकट! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळगाव ः पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या साठ्यात वाढ झालेली नाही. धरणात केवळ 35 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जळगावकरांवर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

जळगाव ः पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या साठ्यात वाढ झालेली नाही. धरणात केवळ 35 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जळगावकरांवर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील नागरिकांना वेळापत्रकानुसार दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाई असल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले असून, समाधानकारक पाऊस न झाल्याने वाघूर धरणातील साठ्यात एक टक्का देखील वाढ झालेली नाही. त्यामुळे भविष्यात महापालिकेकडून पाणीकपात करण्याचे धोरण राबविले जाऊ शकते. 

दोन वर्षांपूर्वी धरण भरले 
वाघूर धरण 2016 मध्ये शंभर टक्के भरले होते. मात्र यंदा तापमानाचा पार देखील वाढलेला असल्यामुळे उन्हाळ्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने घेतलेल्या आकडेवारीनुसार वाघूर धरणात केवळ 35 टक्केच पाणीसाठा आहे. दोन महिन्यात पाणीसाठ्यात वाढ झाली नसून, धरणाची पाणीपातळी 226.00 मीटर इतकी आहे, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिली आहे. 

वर्षभरात इतकी असते मागणी 
शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या वाघूर धरणात पाण्याचा जिवंत साठा 35 टक्के आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला वर्षासाठी 40 दशलक्ष घनमीटर इतकी मागणी असते. वाघूर धरणाची उच्चतम जलपातळी 233.10 मीटर आहे. तर महापालिका 220 ते 200 मीटर जलपातळीवरुन पाणी उचलते. तर डाऊनस्कीम 215 मीटरवर आहे.

Web Title: marathi news jalgaon vaghur water lavel