वाघूर नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा

live photo
live photo

पहूर, (ता. जामनेर) : अजिंठा डोंगररांगेत कालपासून सूरू असतेल्या दमदार पावसामुळे आज वाघूर नदीला मोठा पूर आला. पुरामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हिवरी -हिवरखेडा (ता. जामनेर) या गावांतील संपर्क तूटला आहे. हिवरखेड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे हिवरीतील विदयार्थी आज शाळेत येऊ शकले नाही. येथे पूलाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असून नागरिक त्रास सहन करावा लागत असून विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहूर येथे दुपारच्या सुमारास पूर आला. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन पहूर पेठच्या सरपंच निता पाटील यांनी केले. वाघूर पूलावर मोठी रहदारी निर्माण झाल्याने पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी बंदोबस्त ठेवला आहे. पहूर येथे आठवडे बाजारपट्यात नदीकाठावर पक्के बांधकामे करण्यात येत आहेत. हि बांधकामे धोक्याची ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com