लावू नका तो व्हिडिओ... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

जळगाव : लावू नको रे व्हीडीओ.., बंद कर रे तो व्हीडीओ.., वं मनी माय वं... मना राहुल्या इकस केसांवर फुगे.., मत रो ये मेरे दिल... चुप हो जा हुआ सो हुआ, जलवा ये मेरे जलवा.., राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी... असे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून पंतप्रधान मोदींच्या कार्य कर्तृत्वावर शुभेच्छांचा वर्षाव तर विरोधकांवर टीका टिपण्णी करीत त्यांची खिल्ली उडविली जात असल्याचे दिवसभर सुरू होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत राज्यातील अनेक राजकीय नेत्यांकडून उमेदवारांवर त्याच्या कार्यकर्तृत्वावर किंवा त्याच्या कार्यशैलीवर व्हीडीओ यासह विविध माध्यमांतून आरोप करण्यात आले. आज या रणधुमाळीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाला कौल देवून त्यांना मोठ्या मत्ताधिक्‍क्‍याने विजयी झाल्याने विरोधकांसह मोदी समर्थकांकडून निवडणुकीत केलेल्या आरोपांचे व्हीडीओ व फोटो फेसबुक, इंन्सटाग्राम, व्हाट्‌सऍप, हाईक यासह विविध माध्यमातून सोशल मीडियावर टाकून टिकाटिपण्णी केली. तर अनेकांनी तर मोदी है शेर है यासह त्यांच्यावर स्तुतिसुमने करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

सोशल मीडियावरुन फटके 
लाव रे फटाके.. हा एक तासाचा विशेष कार्यक्रम.., कृष्णकूंज वरून एकच आवाज... बंद करे रे तो व्हीडीओ.., मोदीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी व्हीडीओ दाखविता दाखविता कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र कधी झाला हे कळलेच नाही.., चमच्यांना कस धुवाव ही चहावाल्यांना चांगल माहिती असतं.., राज ठाकरेंमुळेच स्वच्छ भारत अभियानाला नवीन चालना मिळाली. यासह हस्य फवारे उडविणाऱ्या मेसेज व व्हीडीओंनी राज ठाकरेंना चांगलेच फटके मारले. 

मेसेजमधून मोदींचे कार्यकर्तृत्व 
जोपर्यंत आमचे 15 लाख मिळत नाही, तो पर्यंत आम्ही भाजपाला सत्ता सोडून पळून जाऊ देणार नाही.., काबीलीयत इतनी बढाओ की... तुम्हे हराने के लिये कोशीश नही तो साजीश करनी पडे.., कभी वोट भी दिया करो... इंग्रेज समजके हाथ मिलाने आ जाते हैं..., किचड ही इतना कर दीया था विरोधको ने... वहॉं कमल तो खीलना ही थां.. अशा विविध प्रकारचे मेसेज दिवसभर सोशल मिडीयावर व्हायल करून मोदींचे कार्यकर्तृत्व सिद्ध केले जात होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon video raj thakre social media