जिल्ह्यात युती अन आघाडीलाही बंडखोरांचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

जळगाव : जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीत, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही बंडखोरी झाली आहे. सेनेने मुक्ताईनगरात भाजपविरुद्ध तर भाजपने सेनेच्या तीन जागांविरोधात बंडखोरी केली आहे. रावेरमध्ये भाजपविरोधात भाजपनेच बंडखोरी केली आहे. त्यामुळे माघारीपर्यंत हे बंड शमणार काय याची प्रतीक्षा असणार आहे. 

जळगाव : जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीत, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही बंडखोरी झाली आहे. सेनेने मुक्ताईनगरात भाजपविरुद्ध तर भाजपने सेनेच्या तीन जागांविरोधात बंडखोरी केली आहे. रावेरमध्ये भाजपविरोधात भाजपनेच बंडखोरी केली आहे. त्यामुळे माघारीपर्यंत हे बंड शमणार काय याची प्रतीक्षा असणार आहे. 

मुक्ताईनगरात सेनेचे बंड 
जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेनेने बंड केले आहे. युतीतर्फे भाजपच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

रावेरमध्ये भाजपमध्येच बंडखोरी 
रावेर मतदारसंघात युतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांना भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या िंठकाणी भाजपतर्फेच बंडखोरी करण्यात आली आहे. भाजपचे अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

जळगावमध्ये आघाडीला झटका 
जळगाव शहर मतदारसंघात कमकुवत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीलाच बंडखोरीचा फटका बसला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी यांनी बंडखोरी करून समाजवादी पक्षातर्फे अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, समाजवादी पक्षही हा आघाडीचाच घटक पक्ष आहे. त्यामुळे जळगावात तिढा निर्माण झाला आहे. तर कॉंग्रेसचे शैलेंद्र पाटील, विष्णू घोडेस्वार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

"जळगाव ग्रामीण'मध्ये युतीत भाजपची बंडखोरी 
जळगाव ग्रामीण मतदारसंघ शिवसेना व भाजप युतीत शिवसेनेकडे आहे. त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची अधिकृत उमेदवारी आहे. मात्र, या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केली आहे. भाजपचे चंद्रकांत अत्तरदे व लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी अर्ज दाखल केला आहे. 

एरंडोलमध्ये शिवसेनेविरुद्ध भाजपची बंडखोरी 
एरंडोल - पारोळा मतदारसंघात युतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार चिमणराव पाटील अधिकृत आहेत. मात्र, या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केली असून, माजी नगराध्यक्ष गोंविद शिरोळे यांनी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली आहे. 

पाचोऱ्यात सेनेला भाजपच्या बंडखोरी फटका 
पाचोरा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे असून, त्या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी भाजपने बंडखोरी केली असून, अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vidhansabha election