रणांगणातील अंतिम चित्र आज स्पष्ट होणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

जळगाव ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उद्या (ता.7) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, कोण-कोण माघार घेतो, त्यावर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जळगाव ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उद्या (ता.7) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, कोण-कोण माघार घेतो, त्यावर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 
विशेषतः मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाचोऱ्यात शिवसेनेचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे, चोपड्यात शिवसेनेच्या लता सोनवणे यांच्याविरोधात भाजपचे समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे, लक्ष्मण पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यापैकी कोण माघार घेतो, त्यावर त्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. 
उद्या (ता.7) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघार घेता येईल. लागलीच उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. 

...तर दोन "ईव्हीएम' लागणार 
मतदान ईव्हीएम मशिनद्वारेच होणार आहे. एका "ईव्हीएम' यंत्रात 15 उमेदवारांची नावे बसू शकतात. सोळा किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असतील तर दोन ईव्हीएम मशिन लावाव्या लागतील. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव शहर या मतदारसंघात आज 21 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदार संघात पाच उमेदवारांनी माघार घेतल्यास एकच "ईव्हीएम' लागेल, अन्यथा दोन मशिन मतदानावेळी लावाव्या लागतील. 

प्रचाराला केवळ 13 दिवस 
माघारीनंतर लागलीच उमेदवारांना प्रचार सुरू करता येईल. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी फक्त तेरा दिवसांचा कालावधी मिळत आहे. 21 ऑक्‍टोबरला मतदान असल्याने 19 ऑक्‍टोबरला जाहीर प्रचार संपणार आहे (24 तास अगोदर). यामुळे उमेदवारांना मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vidhansabha election candidate form maghar