जळगाव ग्रामीणमधून "राष्ट्रवादी'तर्फे लढणार : गुलाबराव देवकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार आहोत, मतदार संघात संपर्कही सुरू आहे, पक्षनेतृत्वालाही याबाबत आपण माहिती दिली आहे. त्यामुळे इच्छुकांत अर्ज दाखल केला नाही, म्हणून उमेदवार नाही असे कोणीही समजू नये, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार आहोत, मतदार संघात संपर्कही सुरू आहे, पक्षनेतृत्वालाही याबाबत आपण माहिती दिली आहे. त्यामुळे इच्छुकांत अर्ज दाखल केला नाही, म्हणून उमेदवार नाही असे कोणीही समजू नये, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी (ता. 24) पक्षाचे नेते दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. ज्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले त्यांच्याच मुलाखती घेण्यात आल्या होत्या. जळगाव ग्रामीण मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी इच्छुक उमेदवारांत अर्ज दाखल न केल्यामुळे अर्ज दाखल केलेल्या आठ इच्छुक उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. देवकर यांनी अर्ज दाखल केला नसल्यामुळे त्यांना उमेदवारी देवू नये अशी मागणी त्यांनी पक्षाचे नेते दिलीप वळसेपाटील यांच्याकडे केली होती. त्यामुळे देवकर या मतदार संघातून इच्छुक आहेत, की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
याबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जळगाव ग्रामीणमधून लढण्याची तयारी केली आहे. या मतदार संघातील लोकांचा माझ्यावर विश्‍वास आहे, सन 2009 मध्ये जनतेने मला निवडून दिले होते. त्यामुळे माझी या मतदार संघातील जनतेशी नाळ जुळली आहे. ती यापुढेही कायम राहील, मी आमदार असलो, किंवा नसलो तरी या मतदार संघातील जनतेची आपण सेवा करणार आहोत. राहिला प्रश्‍न मी पक्षाकडे अर्ज दाखल करण्याचा. मी नेत्यांना याबाबत माहिती दिलेली आहे, त्यामुळे ते माझे मेरिट तपासतील, जर मी निवडून येऊ शकणारा उमेदवार वाटत असेल, तर ते मला उमेदवारी देतील. पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय हा आपल्याला मान्य असेल. मात्र मी इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला नाही, म्हणून उमेदवार नाही असे विरोधकांनी समजून आनंद व्यक्त करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या आशीर्वादावर लढणार आहोतच. तसेच पक्षात इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला की लगेच उमेदवारी मिळते असे नाही. पक्षातर्फे मतदार संघात सर्वे केला जातो. त्या मतदार संघातील त्यांची विजयी होण्याची क्षमता पाहिली जाते त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली जाते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vidhansabha election gulabrao devkar