जिल्ह्यात 158 कोटीची विद्युतीकरणाची कामे : खासदार पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

जळगाव ः केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून जिल्ह्यात 158 कोटी रुपयांची विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या विद्युत सुविधा मिळणार असल्याचे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे सांगितले. 

जळगाव शहरातील 33/11 के.व्ही.च्या मेहरुण उपकेंद्रात 10 एम.व्ही.ए. क्षमता रोहित्राचे उद्‌घाटन आज झाले. त्याप्रसंगी खासदार पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, नगरसेवक अनिल देशमुख, राहुल वाघ, जीवन अत्तरदे, धीरज सोनवणे, प्रशांत नाईक, भूषण सोनवणे, इक्‍बाल पिरजादे, कार्यकारी अभियंता संजय तडवी आदी उपस्थित होते. 
खासदार पाटील म्हणाले, की केंद्र सरकारच्यावतीने जनसामान्यांच्या हितासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. उज्वला योजनेतून महिलांचे आयुष्य सुकर करण्यासाठी गॅस जोडणीचे वाटप व सौभाग्य योजनेतून गरिबांना मोफत वीज जोडणी याबाबत त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आमदार भोळे म्हणाले, की जिल्ह्यात विद्युतीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. त्यातच शहरात 29 कोटीची विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. मेहरुण उपकेंद्रातील 2 कोटी रुपये निधी खर्च करून झालेल्या रोहित्राच्या क्षमता वृध्दीमुळे तांबापुरा, सिंधी कॉलनी, एकनाथनगर, शांतीनारायणनगर, महाजननगर, हनुमाननगर व मेहरुण या परिसरातील साधारण 22 हजार नागरिकांचा कमी वीज दाबाचा व वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

Web Title: marathi news jalgaon vidyutikaran khasdar patil