विजया बँक दरोडा प्रकरणी आरोपींवर एक लाखाचे बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

रावेर ः तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर पडलेल्या दरोडा आणि खून प्रकरणी महिना होत आला असून अजूनही पोलीस तपासात काहीही निष्पन्न झालेले नाही. अखेर पोलिसांनी आरोपीचे नाव सांगणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत पोलिसांनी एक भित्तीपत्रक तयार केले असून ते ठीक ठिकाणी लावण्यात येत आहे. 

१८ जूनला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निंबोल येथील विजया-बडोदा बँकेच्या शाखेवर दोन दरोडेखोरांनी गोळीबार करून बँकेचे सह शाखा व्यवस्थापक करण सिंह नेगी यांना ठार केले. उद्या या घटनेस एक महिना पूर्ण होईल. मात्र अजूनही दरोडेखोरांची कसलीही माहिती अथवा मागमूस पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अखेर पोलिसांनी आज भित्तीपत्रक तयार केले असून आरोपीचे नाव सांगणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या दोन्ही आरोपींची उंची १७० सेंटीमीटर असून वय ४० ते ४५ वर्षे आहे. दोघांचे पोट सुटलेले असून दोघांनी स्पोर्ट्स शूज घातले आहेत. दोघांनी हेल्मेट घातले असून या दरोडेखोरांची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखा अगर निंभोरा पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vijaya bank darola 1 lakh prize