"त्या' व्हायरल क्‍लिपची सत्यता भाजप वरिष्ठ स्तरावर तपासणार : उदय वाघ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

चाळीसगाव : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीची महिलेसोबतची अश्‍लील चाळ्यांची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले, की याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून क्‍लिपची व छायाचित्रांची सत्यता पडताळण्यात येईल. 

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून भाजपच्या त्या लोकप्रतिनिधीची एका महिलेसोबतच्या अश्‍लील चाळ्यांच्या व्हिडिओ क्‍लिपची चर्चा सुरू होती. मात्र, ती कुठेही व्हायरल करण्यात आली नव्हती. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही क्‍लीप व्हायरल करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश व्हॉटसअप ग्रुपवर ही क्‍लीप आणि छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. त्यात लोकप्रतिनिधी स्पष्ट दिसत असून, त्यांच्यासोबत महिलाही दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 
याबाबत चाळीसगाव येथे एका कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आले असता पत्रकारांनी त्यांना पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या व्हिडीओ क्‍लिप व छायाचित्राबाबत विचारणा केली, त्यावेळी ते म्हणाले, सध्या राजकीय महौल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशा पार्श्‍वभूमीवर ही क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्यात सत्यता काय? हे वरिष्ठ स्तरावर तपासून त्याची पडताळणी करून त्यानंतरच प्रतिक्रिया देण्यात येईल. सद्यःस्थितीत नवीन तंत्रज्ञान आहे. जोडतोड करून ती तयार करण्यात आली आहे काय? याची तपासणी करून करण्यात येईल. नुकताच हा प्रकार झाल्याने पक्षीय वरिष्ठ पातळीवर आपल्याला अद्याप विचारणा झालेली नाही. भाजपतर्फे अंतर्गत क्‍लीप व्हायरल करण्याची शक्‍यताही त्यांनी फेटाळली. 

Web Title: MARATHI NEWS JALGAON VIRAL CLIP UDAY WAGH