"वोटर पॅसेंजर' दुपारी बनली "एक्‍स्प्रेस'! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टप्पा पार पडला. "वोटसाठी नोट' हेच समीकरण बनलेल्या महापालिका मतदानाच्या "स्टेशन'वरची "वोटर पॅसेंजर' दुपारी तीननंतर "एक्‍स्प्रेस' बनली होती. या गाडीला एकामागून एक मतदारांचे डबे जोडले जात होते. साडेपाचचा "सिग्नल' पडल्यानंतर मात्र "गेट' बंद करून "वोटर'ला थांबवावे लागल्याचे चित्र आजच्या प्रक्रियेत पाहण्यास मिळाले. 

महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 303 उमेदवार भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. निवडणुकीत भाजप- शिवसेना यांच्यात काट्याची लढत जवळपास सर्वच प्रभागांमध्ये पाहण्यास मिळाली. मग ही लढत अगदी मते मिळविण्यासाठी मतदारांची पळवापळवी करण्यापर्यंत होती. मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसातपासून सुरवात होऊन सायंकाळी साडेपाचपर्यंत प्रक्रिया पार पडली. पण, मतदानाच्या संपूर्ण दिवसभर फक्‍त अन्‌ फक्‍त "वोटसाठी नोट' हीच चर्चा वॉर्डात होती. म्हणजे नोटेतील "हिरवा सिग्नल' मिळाल्यानंतरच मतदार बाहेर आला होता. 
 
वोट नव्हे, नोट की बात... 

महापालिका निवडणुकीत शहरातील झोपडपट्टी परिसरापासून शिक्षितांच्या वस्तीपर्यंत केवळ "वोट नव्हे; तर नोट की बात' होती. उमेदवारांकडून पैशांचे वाटप होत असल्याची चर्चा होत असल्याने आज सकाळी मतदारांनी केंद्रात येऊन मतदान करणे पसंत केले नाही. यामुळे दुपारी बारापर्यंत केंद्रांमध्ये शुकशुकाट होता. दुपारीही हीच परिस्थिती होती. मतदान केंद्रांतील हे चित्र पाहून उमेदवार आणि कार्यकर्तेदेखील धास्तावले आणि तीननंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी "नोट' चालविण्यात आल्याची चर्चा होती. यामुळे मतदान केंद्रांमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. 
 
एक मिनिटाचा झाला एक तास 
केंद्रात सकाळी मतदान करण्यासाठी आलेले मतदार अवघ्या काही मिनिटांत मत देऊन बाहेर पडत होते. याउलट चित्र सायंकाळी झाले होते. सकाळी साडेसातपासून दुपारी तीनपर्यंत जितके मतदार आले, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या दोन तासांत मतदानासाठी आले होते. यामुळे ज्या केंद्रात मतदान करण्यासाठी एक मिनिट लागत होता, तेथे एकाला एक तास रांगेत उभे राहावे लागत होते.

Web Title: marathi news jalgaon voter line express