भरित बनविण्याचा विश्‍वविक्रम : अडीच हजार किलो वांग्यांचे भरित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव : खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत बनविण्याचा विश्‍वविक्रम आज (ता.21) जळगावातील सागर पार्क मैदानावर सकाळी करण्यात आला. महाकाय कढईत एकाचवेळी अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केला असून, त्यांच्यासोबत अडीचशे जणांचा चमू मदतीस होता. 

जळगाव : खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत बनविण्याचा विश्‍वविक्रम आज (ता.21) जळगावातील सागर पार्क मैदानावर सकाळी करण्यात आला. महाकाय कढईत एकाचवेळी अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केला असून, त्यांच्यासोबत अडीचशे जणांचा चमू मदतीस होता. 
जळगावातील मराठी प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील सागर पार्क मैदानावर खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या सुरवातीला अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार विख्यात शेफ विष्णू मनोहर व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत बनविण्यासाठी दहा फुटांचा व्यास असलेली भव्य कढईत भरीत तयार करण्यात आले. याची तयारी गुरूवारपासून (ता.20) सुरू होती. पहाटेच अडीच हजार किलो वांगे डाळिंबाच्या काड्या, सरपण व पळकाठ्यांवर वांगी भाजण्यात आली. यानंतर विष्णू मनोहर यांनी कढईत तेल व लागणारे साहित्य टाकून फोडणी देत भरीत बनविण्यास सुरवात केली. यावेळी कढईभोवती वीस जण बसून भरिताची प्रक्रिया पुर्ण केली. याच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. भरीत बनविण्यास साधारण दोन- अडीच तासांचा कालावधी लागला. संपुर्ण भरीत बनल्यानंतर जळगावकरांना भरीताचे मोफत वाटप करण्यात आले. 

 

हे साहित्य
भरितासाठी 3200 किलो वांगे, 120 किलो शेंगदाणा तेल, 100 किलो हिरवी मिरची, 50 किलो लसूण, 20 किलो शेंगदाणे, 5 किलो जिरे, 100 किलो कोथिंबीर, 25 किलो जाडमीठ असे साहित्य वापरण्यात येणार आहे. 60 महिला, 40 पुरुष, 20 निरीक्षक व 1 मुख्य निरीक्षक असा चमू या भरितावर काम करेल. 

 

Web Title: marathi news jalgaon wange bharit 2500 kg