जळगावकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ ! 

भूषण श्रीखंडे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव ः शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. त्यात वाघुर धरणातील पाणीसाठा 20 टक्‍क्‍यावर आल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दोनच्या ऐवजी तीन दिवसा आड केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे. याचाच फायदा घेत टॅंकर चालकांचे भाव वधारले आहेत. 

शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. धरणात पाणी साठी अल्प आहे. त्यातच जलवाहिनीला गळती किंवा फुटण्याचे प्रकार होऊन पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. यामुळे नागरिकांना कुठे पाणी मिळते का? यासाठी शोध घ्यावा लागत आहे. त्यात टॅंकर चालक नेहमीपेक्षा जादा दराने पाण्याची विक्री करत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. नागरिकांची ही होणारी आर्थिक लूट जिल्हा शासनाने पावले उचलून थांबवावी अशी मागणी होत आहे. 

शहरात सुमारे 30 टॅंकर 
जळगाव शहरात सुमारे 30 टॅंकर असून बांधकाम, हॉटेल, लग्नसोहळा आदी कार्यक्रम तसेच विविध कामांसाठी टॅंकरची मागणी होत असते. त्यात धरणात पाणीसाठा कमी, वारंवार फुटणारी जलवाहिनीमुळे शहरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने काही टॅंकर चालक अव्वाचे सव्वा दर आकारत आहे. 

दोन महिन्यात टॅंकरचा भाव दुप्पट 
दोन महिन्यापूर्वी शहरात 400 ते 700 रुपये टॅंकरचा दर होता. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसात काही टॅंकरचालक एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत दर घेत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. 

दोनशे लिटरची टाकी 30 रुपयाला 
आर्थिक परिस्थिती कमी असलेले नागरिक तसेच पाणी साठविण्याचे साधन कमी असलेल्या नागरिकांना काही टॅंकर चालक पाणी वाटप 100 ते 200 लिटरच्या टाकी, कॅन आदी भरून देत आहे. दोनशे लिटरची टाकीसाठी सध्या 30 रुपये घेतले जात आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon water cash