लाखो लिटर्स पाण्याचा अपव्यय : फुटलेल्या जलवाहीनीतून उंच कारंजे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

जळगाव, ता. 13 : भरदुपारी उन्हाचा तडाखा,जळगाव भुसावळ महामार्गावर वाहनांची वर्दळ अशातच पाण्याचे उंचंच उंच फवारे दिसू लागले. भरउन्हात दिसणारे हे फवारे डोळ्यांना आल्हाददायक वाटत असले तरी मनात मात्र वाया जाणाऱ्या पाण्याबाबत चिंता व्यक्त होत होती. जुन्या टोलनाक्‍यानजिक एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवानाही फुटल्यामुळे लाखोलिटर्स पाण्याचा अपव्यय होता होता. 

भुसावळच्या तापी नदीतून जळगाव शहराच्या एमआयडीसी भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या नशिराबाद जवळील बंद असलेल्या टोलनाक्‍यानजिक ही जलवाहीनी फुटली. त्यातून पाण्याचे उंच पाण्याचे कारंजे उडत होते. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात लाखो लिटर्स पाण्याचा अपव्यय होतांना दिसत होते. महामार्ग असूनही अनेक वाहनधारक वाहन थांबवून जलवाहीनीतून उंच उडणाऱ्या या पाण्याचे दृश्‍य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते. दृश्‍य चांगले दिसत असले तरी अनेक जण पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाबाबत चिंता व्यक्त करीत होते. याबाबत याच जलवाहीनीसमोर असलेल्या गॅरेज व ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले कि, दोन वाजेपासून ही जलवाहीनी फुटलेली आहे. मात्र एमआयडीसी विभागाच्या अधिकारी अद्यापही या ठिकाणी आलेले नाहीत.

Web Title: marathi news jalgaon water pipeline likej