"वाघूर'वर आज बसविणार 500 अश्‍वशक्तीचे पंप; एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

"वाघूर'वर आज बसविणार 500 अश्‍वशक्तीचे पंप; एक दिवस उशिराने पाणीपुरवठा

जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा पाणीपुरवठा एकदिवस उशिराने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 
शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वरील सध्याच्या पंपांची क्षमता कमी झाल्याने नवीन पंप बसविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले. त्यानुसार उद्या (ता. 14) 
हे 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविले जाणार आहेत. तसेच वाघूर धरण ते पंप हाऊसपर्यंतच्या 2 हजार 150 मिलिमीटरच्या मुख्य जलवाहिनीवर 600 मिलिमीटर व्यासाचे 6 स्लुईस व्हॉल्व्ह बसविले जाणार आहेत. त्यासाठी 30 तास किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला आहे. त्यामुळे 14 रोजी होणारा पाणीपुरवठा हा 15 रोजी होईल तर, 15 रोजी होणारा पाणी पुरवठा हा 16 रोजी होईल, तसेच 16 रोजीचा होणारा पाणीपुरवठा हा 17 ला, तर 17 रोजीचा पाणीपुरवठा हा 18 रोजी होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिली. तर उद्या (ता.14) मेहरुणच्या काही भागात पाणीपुरवठा होणार आहे. 
 
या भागात बुधवारी होणार पाणीपुरवठा 
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर. खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज टाकीवरील भाग- दांडेककरनगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस. एम.आयटी परिसर, योगेश्‍वरनगर, हिरापाइप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, श्‍यामाफायर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, डीएसपी टाकीवरून पहिला दिवस- महाबळ, मोहननगर, आनंदनगर, नागेश्‍वर कॉलनी, मेहरुण पहिला दिवस- रामेश्‍वर कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्‍सानगर, गणेशपुरी, मलिकनगर, रामनगर, नित्यानंद टाकीवरून मोहननगर, गायत्रीनगर, नेहरुनगर. गिरणा टाकी - राका पार्क, वाघनगर, लक्ष्मीनगर, सुयोग कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, शिवकॉलनी गट क्रमांक 59/60, शिक्षक कॉलनी, विद्युत कॉलनी. 

या भागात गुरुवारी पाणीपुरवठा 
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा-हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी दुसरा भाग, शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिकाश्रम, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलाला भाग. नित्यानंद टाकीवरील दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, जाकीर हुसेन कॉलनी, डीएसपी टाकी- इंद्रप्रस्थनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, टेलिफोनगर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग. ऑफिसर क्‍लब टाकी परिसर. गिरणा टाकीवरील उंच टाकी, भगवानगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, महेरुण भागातील राहिलेला परिसर बुस्टर पंप, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर. अयोध्यानगर, सतगुरूनगर, हनुमान नगर, लिलापार्क, गौरव हॉटेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com