शहरात होतोय दूषित पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

जळगाव ः महापालिकेतर्फे शहरात वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक भागात दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे विविध आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. अनेक ठिकाणी "अमृत'च्या कामांमुळे तसेच जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळतीमुळे हे दूषित पाणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

वाघूर धरणातून पाणी उचलून ते उमाळा येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते शहराला केले जाते. परंतु जलवाहिनीला लागलेल्या अनेक गळतीमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. यात महाबळ परिसर, रामानंदनगर, हरिविठ्ठलनगर आदी परिसरात दूषित पाणी येत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्‌भवले असून, लहान मुलांसह, वृद्ध आजारी पडले आहेत. त्यामुळे महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात 
महापालिकेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने पोटाच्या आतड्यांवर सूज, जुलाब आदी आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असून, याकडे महापालिका प्रशासनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दूषित पाणी 
शहरात अनेक ठिकाणी अमृत योजनेचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी नळ संयोजनला गळती लागल्याचे दिसत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असून, त्यामुळे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे त्वरित गळती बंद करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

Web Title: marathi news jalgaon water suply