पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

जळगाव ः वाघूर पाणीपुरवठा योजनेतील रॉ-वॉटर पंपिंग ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एअरव्हॉल्व्ह, वॉशआऊट व्हॉल्व्ह व गिरणा टाकी येथील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम उद्या (20 डिसेंबर) दिवसभर सुरू राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. 
वाघूर पाणीपुरवठा योजनेवरील रॉ-वॉटर पंपिंग ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा एअर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला आहे. तसेच वॉशआऊट व्हॉल्व्ह व गिरणा पंपिंग येथील व्हॉल्व्हही खराब झाल्याने हे व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम उद्या (20 डिसेंबर) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमाळा जलशुद्धीकरण केंद्र व गिरणा टाकी येथे पाण्याची साठवण होती. परिणामी गुरुवारचा (20 डिसेंबर) होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (21 डिसेंबर), शुक्रवारचा (21 डिसेंबर) पाणीपुरवठा शनिवारी (22 डिसेंबर) व शनिवारचा (22 डिसेंबर) पाणीपुरवठा रविवारी (23 डिसेंबर) होईल. 

21 डिसेंबरला होणारा पाणीपुरवठा 
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदा रोड, नित्यानंदनगर टाकी, मोहननगर, नेहरूनगर, खंडेरावनगर परिसर- हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज टाकीवरील भाग- दांडेकरनगर, निसर्ग कॉलनी, असावानगर, खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, गेंदालाल टाकी भाग- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी, योगेश्‍वरनगर, हिरा पाइप, शंकररावनगर, खेडी गाव. डीएसपी बायपास- तांबापुरा, श्‍यामा फायर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर. डीएसपी टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर. 

22 डिसेंबरला होणारा पाणीपुरवठा 
खंडेरावनगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिकाश्रम, खोटेनगर टाकी राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी परिसर राहिलेला भाग, नित्यानंदनगर टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, डीएसपी टाकी- जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर्स क्‍लब टाकी परिसर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी- भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी. मेहरुण भाग- मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्‍बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर. 

23 डिसेंबरला होणारा पाणीपुरवठा 
नटराज टाकी ते चौघुले मळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळिरामपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल भाग- खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, केसी पार्क, गेंदालाल मिल. रिंग रोड संपूर्ण- भिकमचंद जैननगर, भोईटेनगर. आकाशवाणी टाकीवरील भाग- जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमू कलानी टाकीवरील परिसर- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी. डीएसपी टाकी- साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com