अद्‌भूत "सुपर मून' उद्या आपल्या भेटीला ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अंतर कमी झाल्यामुळे इतर दिवशी आकाशात दिसणाऱ्या आकाराच्या तुलनेत चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसतो. आकाराने मोठा दिसणाऱ्या पौर्णिमेच्या या चंद्राला "सुपरमून' म्हणतात.

जळगाव  : अंतराळात विविध परिस्थितीत दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या अद्‌भूत खगोलीय घटनांपैकी "सुपर मून'ची घटना बुधवारी (ता. 8) घडणार आहे. या दिवशी उगवणारा चंद्र नेहमीपेक्षा आकाराने थोडा मोठा दिसणार आहे. या चंद्राला "सुपरमून' असे म्हणतात. 

चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा थोडी अंडाकृती आहे. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सतत बदलत असते. चंद्र पृथ्वीच्या कधी जवळ तर कधी दूर असतो. जवळ असलेल्या बिंदूला "पेरिगी' (Perigee Point) आणि दूर असलेल्या बिंदूला अपोगी (Apogee Point) म्हणतात. पृथ्वीभोवती फिरताना चंद्र पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी सगळ्यात जवळच्या पेरिगी बिंदू वर येतो, त्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सगळ्यात कमी असते. अंतर कमी झाल्यामुळे इतर दिवशी आकाशात दिसणाऱ्या आकाराच्या तुलनेत चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त प्रकाशित दिसतो. आकाराने मोठा दिसणाऱ्या पौर्णिमेच्या या चंद्राला "सुपरमून' म्हणतात, अशी माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The wonderful "Super Moon" to visit you tomorrow!