कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परवड- यावल तालुक्यात तपासणीकडे दुर्लक्ष 

cotton
cotton

यावल : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आहे. त्यामुळे शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्री न झालेल्या कापसाची येत्या दोन दिवसात तपासणी करुन, पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात एकमेव यावल तालुक्यात शासनाचे कापूस हमी खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे तालुक्यातील कापूस विक्री न झालेल्या शेतकऱ्यांची यादी तहसील, व साहाय्यक निबंधक कार्यालयापर्यंत पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. 

हे नक्की वाचा ः बियाण्यांचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई ः कृषीमंत्री दादा भुसे 
तालुक्यात किंबहुना यावल शहरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. त्यामुळे स्थानिक महसूल यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेत गुंतली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शासनाचे कापूस हमी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. बाजारभावापेक्षा शासनाच्या खरेदी केंद्रावर कापसाला जास्त दर आहे. अशा परिस्थितीत काही व्यापारी शेतकरी वर्गाच्या माध्यमातून खरेदी केंद्रावर कापूस विकत असल्याची सर्वत्र ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाची तपासणी, पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, यावल तालुक्यात अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरुच झाले नसून, काही शेतकऱ्यांनी नजीकच्या म्हणजे भुसावळ, रावेर, चोपडा, जळगाव येथील केंद्रावर नाव नोंदणी केली आहे. तर काहींचा कापूस केंद्रावर, तर काही लहान शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्याकडे विक्री केला आहे. 

शिल्लक कापसाची यादी बनविण्याची मागणी 
यावल येथे खरेदी केंद्र सुरु नसल्याने नोंदणीच नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची यादी नाही. लॉकडाउनमुळे सहसा घराबाहेर न पडणाऱ्या शेतकऱ्यांचा कापूस संबंधित यंत्रणेने थेट घरोघरी जाऊन तपासणी, पंचनामा करून शिल्लक कापसाची यादी बनविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. एकेकाळी कापसासाठी प्रसिद्ध असणाऱ्या यावल तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीच परवड होत आहे. आधीच खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे गेला, केळी मातीमोल भावात विकावी लागली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com