यावल, रावेर तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सावदा : यंदा यावल, रावेर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल, रावेर भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा बसविण्याबाबत मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल व मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. 

यावल, रावेर तालुक्यात मागील वर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे धरणातील पाणी साठा संपलेला आहे. यामुळे या भागांची ओळख असलेली केळी जळल्यामुळे शेतकऱ्यांचे साधारण १०० ते १५० कोटीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे आणि चालू वर्षीही पाऊस कमी तर आहेच. पण पावसाचे आगमन ही उशिरा होणार आहे. हा अंदाज लक्ष्यात घेता राज्य सरकारने दुष्काळी पट्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू केली आहे. 
इतिहासात पहिल्यांदाच यावल, रावेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सातपुडा पर्वतांच्या पायथ्याशी कृत्रिम पाऊस उभारण्याची यंत्रणा उभारण्याची गरज आहे अशी मागणी हरीभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील आणि मा.सचिव मदत व पुनर्वसन यांना पत्राद्वारे केली केली आहे. यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्ष्यात घेता राज्य सरकारने ३० कोटीची तरतूद या कामी केली आहे.या भागामधे जुलै-ऑगस्ट महिन्यात जास्त आद्रतेचे ढग असताना कृत्रिम पाउस पाडणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yawal raver krutrim rain draoped jawade nivedan