योगा करा अन्‌ मन, शरीराने राहा तंदुरुस्त..! 

योगा करा अन्‌ मन, शरीराने राहा तंदुरुस्त..! 

जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक, शारीरिक व्याधी जडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात महाग झालेल्या वैद्यकीय उपचारामुळे नागरिक आता निरोगी शरीर राहण्यासाठी स्वत:च्या "फिटनेस'कडे जास्त लक्ष देत आहेत. त्यातून योगा करण्याकडे कल वाढला असून, याबद्दल नागरिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे जळगाव शहरात सुमारे 15 योगाचे क्‍लास असून, मोठ्या प्रमाणात सकाळी व सायंकाळी योगा करणाऱ्यांची गर्दी क्‍लासेसमध्ये गर्दी दिसत आहे. 

शहरात योगा क्‍लासमध्ये वाढ 
शहरात आधी तीन ते चार योगशिक्षक योगाचे क्‍लास घेत होते. परंतु, नागरिकांमध्ये वाढलेली योगाबद्दल जागृकता तसेच योग शिक्षकांचे प्रमाण देखील वाढल्याने सुमारे शहरात 15 योगाचे क्‍लास शहरात चालतात. तसेच घरोघरी जाऊन (होम क्‍लासेस) योगाचे धडे दिले जातात. यातून हजारो नागरिक योगाकडे वळले असून, आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी योगा करत आहेत. 

महिलांमध्ये वाढली "क्रेझ' 
सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन घरातील काम, कुटुंब सांभाळत महिला आता स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसतात. योगा शिकण्याकडेही महिलांचा कल वाढला आहे. 

"रनर ग्रुप'चा योगाकडे कल 
जळगाव शहरात "रनर ग्रुप' मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे फिटनेसबाबत जळगावकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृकता वाढली आहे. त्यात धावणाऱ्या ग्रुपमधील सदस्य आठवड्याला ठराविक दिवशी रनिंग, इतर दिवशी योगाचे व्यायाम करून शरीर लवचिक, तंदुरुस्त तसेच शारीरिक व मानसिक क्षमता ही योगातून वाढवीत आहे. त्यामुळे शहरात 22 नोव्हेंबर 2019 ला झालेल्या खानदेश मॅरेथॉन स्पर्धेत योगा ग्रुपच्या सुमारे 50 रनर्सने मिनी मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पार पाडली. 

असे आहे "योगा'चे शुल्क 
- होम ट्यूशन (सर्व कुटुंब सदस्य) : 6 हजार रुपये महिना 
- क्‍लासचे शुल्क : 500 रुपये महिना (प्रति व्यक्ती) 

 
शहरात योगाबद्दल गेल्या काही वर्षात जागृकता वाढली आहे. योगा शिकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. आमचे वर्षभर योग व्यायाम क्‍लासेस सुरू असून, यातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरुष, वृद्धांचे देखील प्रमाण वाढले आहे. 
- सुनील गुरव (योगशिक्षक) 

महिलांमध्ये योग व्यायामाबद्दल प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. यात तरुणींपासून ते वृद्धांचा देखील समावेश आहे. कुटुंबाचा सांभाळ करत स्वत:चे आरोग्य व शरीर फिट राहण्यासाठी महिलांचे योग शिकण्यासाठी मोठ्या संख्येने येत असून महिलांमध्ये स्वत:चे शरीर तंदुरुस्त ठेवण्याबाबत जागृती निर्माण झाली, ही चांगली बाब आहे. 
- अर्चना गुरव (योगशिक्षिका) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com