तरुण बदल घडवू शकतात; त्यासाठी मतदान करा : डॉ. प्रीती अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

जळगाव ः केंद्र व राज्यातील सरकार निवडून देण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक जण विचार 
करतो त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका निवडणुबाबतही विचार करणे गरजेचे आहे. तरुणच बदल घडवू शकतात, त्यासाठी त्यांनी स्वतः तर मतदान करायलाच हवे त्याशिवाय शेजारी-पाजारी व पालकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी केले. 

"सकाळ'तर्फे आयोजित मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत आज रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर, युनिट मॅनेजर संजय पागे उपस्थित होते. 
डॉ. अग्रवाल म्हणाल्या, की सध्या जळगाव महापालिका निवडणुकीची धूम सुरू असून, एक ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात अनेक तरुण-तरुणी मतदानाचा प्रथमच हक्क बजावतील. तुम्ही मतदान कराच; त्यासोबत घरातील आपले पालक, शेजारी, मित्रांमध्येही मतदानासंदर्भात जनजागृती करा. ते तुमचे सामाजिक दायित्व आहे. त्यासाठी तुम्ही जबाबदारी घ्यायला हवी. प्रा. विजय गारगे यांनी सूत्रसंचालन केले. 

मतदान करणे, हा आपला हक्क ः रनाळकर 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने "सकाळ माध्यम समूह' मतदान जनजागृती मोहीम राबवत आहे. अनेक नवमतदार या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करतील. त्यांनी हा त्यांचा हक्क आवर्जून बजवावा. महापालिका प्रशासनाशी तुमचा दररोज संबंध येत असतो. तुम्ही मतदान केल्यावर निवडून दिलेल्या उमेदवाराला हक्काने तुमच्या समस्या सांगू शकतात. त्यासाठी मतदान करा आणि दुसऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करा. 

"मी मतदान करणारच' 
मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रमात डॉ. प्रीती अग्रवाल यांनी इन्स्टिट्यूटमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी डॉ. अग्रवाल यांनी शपथ वाचली. त्यापाठोपाठ विद्यार्थिनींनी "जळगाव महपालिकेत सुशासन देण्यासाठी मी मतदान करणारच...', अशी शपथ घेतली.

Web Title: marathi news jalgaon young voter priti agrawal