"युती'चं खडसे-महाजन पाहतील ः पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव ः जळगावात भाजप-सेना- खानदेश विकास आघाडीशी युती करावयाची कि नाही, हे आपले नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हेच निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाची वाट पहावी. कार्यकर्त्यांनी नाराजी असली तर ती व्यक्त करून काम करीत रहावे, असे मत राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहे. महापालिकेच्या निवडणूका जाहिर झाल्या असून पक्षातर्फे उमेदवारांची तयारी सुरू आहे. जळगावात भाजप-सेना-खानदेश विकास आघाडी युती होत असल्याने भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आहे. शहरातील आदर्श नगरात पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी युतीबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यामुळे आम्हाला उमेदवारी मिळणार आमच्या अन्याय होत आहे. अशी तक्रारही व्यक्त केली. त्यावर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, कि सर्वानाच न्याय मिळू शकत नाही, काही जणांवर अन्याय होतोच. आणि काही जणांवर अन्याय म्हणजे "न्याय'हीच न्यायाची व्याखा आहे. परंतु अन्याय झाला म्हणून काही जणांनी घरी बसून राहणे योग्य नाही. त्यांनी कुरकुर तक्रार जरूर करावी परंतु पुन्हा कामाला लागावे. 

Web Title: marathi news jalgaon yuti chandrkant patil