जळगावात युती पक्की, उमेदवारीचेही ठरले : गिरीश महाजन, सुरेशदादा जैन यांचे सूतोवाच 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

जळगाव ः भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती विधानसभा निवडणुकीत जळगावात तरी पक्की असून, उमेदवारीबाबतही आमचे ठरले आहे, असे सूतोवाच भाजप नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री-शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी केले. निमित्त होते मेहरूण तलाव चौपाटीवर "मराठी प्रतिष्ठान'तर्फे आयोजित भजी महोत्सवाचे. 

"मराठी प्रतिष्ठान'तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आज मेहरूण तलावकाठानजीक चौपाटीवर पावसाळ्यातील भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, त्यात ते बोलत होते. माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे आदी यावेळी उपस्थित होते. "मराठी प्रतिष्ठान'चे जमील देशपांडे व विजय वाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सुरेशदादा जैन व मंत्री महाजन यांनी एकमेकांना भजी भरविली, आमदार भोळे व सुरेशदादा जैन यांनीही एकमेकांना भजी भरविली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला. 
मंत्री महाजन म्हणाले, की भाजप व शिवसेनेची युती होणारच आहे. उमेदवारीबाबतही आमचे ठरलेले आहे. तर माजी मंत्री सुरेशदादा जैन म्हणाले, की विधानसभेसाठी जळगावात भाजप-शिवसेनेची युती आहेच. जागा कोणाला जाणार? याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. युतीत ज्या पक्षाला ही जागा जाईल त्याच्या उमेदवाराचा एकत्रित प्रचार करण्यात येईल. भजी महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yuti girish mahajan suresh jain