जिल्हा परिषद, महापालिकेतील भाजप, शिवसेना विरोधाचे काय? 

जिल्हा परिषद, महापालिकेतील भाजप, शिवसेना विरोधाचे काय? 

जळगाव : शिवसेना, भारतीय जनता पक्षाची लोकसभा आणि विधानसभेतही युती झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच काही पालिकातही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहे. त्या ठिकाणी काय चित्र असणार? असा प्रश्‍नचिन्ह आहे. जळगाव जिल्हा परिषदेत तर भाजप कॉंग्रेसच्या साथीने सत्तेत आहे. 

भारतीय जनता पक्ष व शिवसेना लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीसाठी युती आज जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेतील युतीबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यात स्थानिक स्तरावर मात्र मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जळगाव जिल्हा परिषद, महापालिका आणि तालुक्‍यातील काही पालिकाही शिवसेना व भारतीय जनता पक्षाने एकमेकांच्या विरोधात लढल्या आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत 25 वर्षाची सत्तेतील युती तुटली आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी शिवसेनेला सोबत न घेता चक्क कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्ता मिळविली. विशेष म्हणजे या ठिकाणी कॉंग्रेसला सभापतिपदही देण्यात आले आहे, तर शिवसेना विरोधात आहे. जिल्हा परिषदेत भाजपकडे 33 तर शिवसेनेकडे 25 जागा आहेत. सत्तेतील जुन्या फॉम्युल्याप्रमाणे युतीत भाजपकडे अध्यक्षपद, तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद होते. तसेच दोन सभापतिपदही शिवसेनेकडे होते. 

महापालिकेत एकमेकांचे विरोधक 
जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर असलेली सत्ता भाजपने खाली खेचून आपला झेंडा फडकविला आहे. या ठिकाणी शिवसेना आज विरोधी पक्षात आहे. या शिवाय पाचोरा, पारोळा, भुसावळ, अमळनेर, पालिकातही हीच स्थिती आहे. मुक्ताईनगर नगरपरिषदेतही शिवसेना विरोधक आहे. 

स्थानिक स्तरावर काय? 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वरीष्ठस्तरावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत काय? स्थानिक स्तरावर कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध लढले आहेत. शिवाय या ठिकाणी भाजप सत्तेत राहील मात्र शिवसेना विरोधात असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्तेतही लोकसभा व विधानसभेप्रमाणे सत्तेचा वाटा का नाही असा प्रश्‍न शिवसेनेतर्फे उपस्थित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे युती वरिष्ठ स्तरावर झाली असली तरी स्थानिक स्तरावर प्रश्‍न अद्याप कायम असून आता कार्यकर्त्यांचे खऱ्या अर्थाने त्याकडेच लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com