कांद्याच्या दरात सव्वाशे रुपयांनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

गणपूर (ता. चोपडा) : गेल्या आठवड्यात पुन्हा घसरणीवर आलेल्या कांद्याच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे 120 रुपयांची वाढ लासलगाव बाजारात नोंदवली गेली आहे. संभाव्य नुकसान भरून निघण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिक, नगर, निफाड, चांदवड, दिंडोरी, राहुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव भागातील उन्हाळी कांद्याची काढणी जवळपास संपली असून मधल्या काळात नाफेडमार्फत खरेदी करण्यात आली. तर त्यानंतरच्या काळात उत्पादकांनी कांदा चाळीत भरण्यास सुरवात केली. खानदेशात काही शेतकऱ्यांनी बांधलेल्या चाळीत तर काहींनी तात्पुरती जाळी लावून तयार केलेल्या चाळींमध्ये कांदा भरला. खानदेशात तर पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबडी न ठेवता चार महिन्यांसाठी कांदा भरल्याचीही उदाहरणे आहेत. 
 
खानदेशातही दर सुधारण्यास वाव 
पुढील हंगामात खरीप कांदा येण्यापूर्वी देशात 60 ते 70 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज भासेल. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यानंतर कांद्याला चांगले दर राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तूर्तास मात्र, लासलगाव बाजारात कांद्याची मोठी आवक असतानाही बाजारभाव चारशे ते नऊशे रुपये प्रतिक्विंटल होते. सरासरी भाव 720 रुपये होता. त्यामुळे खानदेशातील स्थानिक खरेदीचे घसरलेले दर सुधारण्यास वाव मिळणार आहे. 

लासलगाव बाजार समितीतील 
कांद्याच्या अलीकडचे भाव असे 
- 14 मे 2018 : आवक 29.420 क्विंटल..... सरासरी भाव 670 
- 18 मे 2018 : आवक 22.310 क्विंटल..... सरासरी भाव 601 
- 21 मे 2018 : आवक 13.435 क्विंटल..... सरासरी भाव 710 
- 22 मे 2018 : आवक 12.000 क्विंटल..... सरासरी भाव 720 
 
Web Title: marathi news jalgaoon kanda rate