संचारबंदीचे उल्लंघन... पाच व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

संचारबंदीचे उल्लंघन... पाच व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमधील घाऊक व्यापारी किरकोळ भाजीपाला विक्री करताना आढळून आले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पाच व्यापाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी टाळण्यासाठी कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. तसेच भाजीपाला मार्केटमध्ये घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ भाजीपाला विक्री करू नये. याबाबतचे परिपत्रक देखील बाजार समितीने काढले होते. मात्र तरी देखील आज सकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्यांना काही नागरिक किरकोळ भाजीपाला घेऊन जात असताना दिसून आले. यावेळी त्यांनी या नागरिकांची विचारपूस केली असता. त्यांनी हा भाजीपाला यार्डातील काही व्यापाऱ्यांकडून खरेदी केला असल्याची माहिती दिली. 

सभापतींच्या उपस्थितीत पोलिसांची कारवाई 
किरकोळ भाजीपाला विक्री करू नये याबाबतचे आदेश असताना देखील व्यापाऱ्यांकडून नागरिकांना किरकोळ भाजीपाला विक्री केला जात असल्याने सभापती कैलास चौधरी, सचिव रमेश माळी, कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, कृष्णा पाटील यांच्या पथकाने व्यापाऱ्यांवर कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com