वीरांगना स्वाती महाडिक यांची संघर्षकथा दहावीच्या पाठ्यपुस्तकात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पहूर (ता. जामनेर) : जम्मू- काश्मीरच्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या संघर्षकथेचा समावेश दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकांत करण्यात आला आहे.'वीरांगना' या स्थूलवाचनातून त्यांची विद्यार्थ्यांशी 'ग्रेट भेट' होणार आहे.
पतीनिधनाचे असिम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयाने प्रेरीत होवून भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेचा बालभारतीने सन्मान केला असून त्यांची संघर्ष कथा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे .

भारतीय सैन्य आणि वर्दीला सर्वस्व मानणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांना 17 नोव्हेंबर2015 रोजी दहतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरगती मिळाली. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती महाडिक यांनी वयाच्या चाळीशीच्या आसपास असूनही निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला .स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा, शारीरिक, वैद्यकिय चाचण्या या साऱ्या गोष्टी त्यांनी कठोर मेहनतीने यशस्वी केल्या. कार्तिकी आणि स्वराज या चिमुकल्यांना घरी ठेवून त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी मध्ये अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पुर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. पित्याचे छत्र हरपलेल्या आपल्या मुला -मुलीनेही सैन्यात जावे असा त्यांचा निर्धार आहे.
स्त्रीशक्तीची उपासना करणाऱ्या आपल्या देशात स्वाती महाडिक यांच्या रुपाने खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडले आहे. त्यांच्या संघर्ष कथेतून दहावीच्या विद्यार्थ्यांना निश्चतच प्रेरणा मिळणार आहे. "आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्टपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. असा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
       
"लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत स्वतःला सिद्ध केले . त्यांची संघर्ष कथा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे . स्वाती महाडिक यांचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहे."
वैशाली घोंगडे, मराठी शिक्षिका

Web Title: marathi news jamner 10th silyabus virangana