पहूरकरांकडून शेरीच्या तलावातून हजारो लिटर पाण्याची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पहूर (ता. जामनेर) : येथील शेतकऱ्यांकडून शेरी (ता. जामनेर) साठवण तलावातून हजारो लिटर पाण्याची चोरी होत असल्याने पहूरपेठ वासीयांची तहान भागविण्यासाठी पुढे आलेल्या शेरीकरांवरच दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. गावाला पाणी पुरवण्याच्या नावाखाली काही शेतकरी स्वार्थापोटी स्वतःच्याच शेतात पाणी जिरवत आहेत. त्यामुळे या अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाने जप्त करून संबधीत शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त शेरीकरांनी केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा दिला आहे.

भविष्याचा विचार करुन पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्याने शेरी साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा दुष्कळी परिस्थितीतही टिकून होता. सर्व शेरीकरांनी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यातच आपापल्या मोटारी स्वतःहून काढून घेतल्या. परिणामी सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असतानाही शेरी साठवण तलावात शेरीकरांना पुरेल एवढा साठा शिल्लक होता .पहुरपेठ वासीयांची चाललेली पाण्यासाठीची भटकंती पाहून आणि पहूर पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या विनंतीनुसार शेरीकरांनी दोन मोटारी बसवू दिल्या. त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू होवून पहूरवासीयांच्या टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या. परंतू गावाला पाणी पुरवण्याच्या नावाखाली पहूरच्या सुमारे तेरा ते पंधरा शेतकऱ्यांकडून अवैधरित्या तलावात मोटारी टाकून हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसात शेरीलाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या अवैध मोटारी तहसिलदार यांनी तत्काळ कारवाई करून जप्त कराव्यात अन्यथा उपोषण करण्याचा ईशारा संतप्त शेरीकर ग्रामस्थांनी दिला आहे .

योग्य नियोजन करून आम्ही पाणी साठवून ठेवले. पहूर पेठ वासीयांची तहान भागावी यासाठी दोन मोटारी बसवायची परवानगी आम्ही दिली. परंतू आज तलावात पंधरा मोटारी आहेत. हजारो लिटर पाणी चोरले जात आहे. प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा शेरीकर उपोषण करतील.
प्रभाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शेरी

शेरी साठवण तलावातून दोन मोटारीद्वारे गावाला पाणी मिळत आहे. उर्वरीत मोटारी ग्रामपंचायतीच्या नाहीत. शेरीकरांसारखेच आम्हीही नियोजन करणार आहोत.
नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूरपेठ

Web Title: marathi news jamner dam water