महाजनांच्या सफाईनंतर रूग्णालयाचे गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आमदार गिरीष महाजन हे गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्‍यातील जनतेला भुलथापा देत असून, स्वत:ला आरोग्यदूत म्हणून घेत रायरंगाचे सोंग करणाऱ्यांमुळे या रूग्णालयाला अवकळा लागलेली होती. ती आज आम्ही होमहवन व गोमुत्र शिंपडून दुर केली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी यावेळी सांगितले.​

जामनेर : रूग्णाला आजारातून बरे करण्यासाठी रूग्णालयात धावा घेतला जातो. रूग्णालयाची असलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तीन दिवसांपुर्वी स्वतः उभे राहून साफसफाई केली. पण यानंतर अजबच प्रकार करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात होमहवन व गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करण्याचे काम केले. 

हेपण वाचा -  चोपड्याच्या या पतसंस्थेचे चेअरमन व संचालकांना अपात्रतेची नोटीस 

जामनेर तालुक्‍यातील उपजिल्हा रूग्णालयात काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी जाऊन तिथे साफसफाई करून घेतली होती. त्यानतंर आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती.

नक्‍की पहा - Video माती खचताच मानेपर्यंत दबला...अडीच तास चालले प्रयत्न 

आमदार गिरीष महाजन हे गेल्या पंचवीस वर्षांपासून तालुक्‍यातील जनतेला भुलथापा देत असून, स्वत:ला आरोग्यदूत म्हणून घेत रायरंगाचे सोंग करणाऱ्यांमुळे या रूग्णालयाला अवकळा लागलेली होती. ती आज आम्ही होमहवन व गोमुत्र शिंपडून दुर केली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, माजी नगरसेवक अनिल बोहरा, माधव चव्हाण, विलास पाटील, जितेश पाटील, कॉंग्रेसचे शंकर राजपूत, किरण पाटील, गणेश झाल्टे, संजय जैन, रफीक मौलाना, शफी पेंटर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner hospital homhavan mahavikas aaghadi girish mahajan