पहूरला रेशनच्या बायोमेट्रीक प्रणालीतून नावे गायब!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पहूर (ता. जामनेर) : धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसावा, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी रेशनींग दुकानावर बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र पहूर कसबे येथील असंख्य लाभार्थ्यांची  नावेच बायोमॅट्रीक प्रणालीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. परिणामी नावे नसल्यामुळे संबधीत लाभार्थी धान्यापासून वंचीत आहेत.

पहूर कसबे येथे 2तर पहूर पेठ येथे 3 रेशन मालाची दुकाने आहेत. कसबे येथील दोन्ही दुकानांवरील लाभार्थ्यांची संख्या सुमारे 1510आहे. मात्र यापैकी बहूतांश लाभार्थ्यांची नावे बायोमेट्रीक प्रणालीत अद्यावत झालेली नाहीत. काही कुटूंब प्रमुखांची नावे आहेत तर सदस्यांची नावे नाहीत, त्यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोर-गरीब लाभार्थी तीन -चार तास रांगेत उभे राहून नाव न आल्यामुळे रिकाम्या हाती घरी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने संबधीत लाभार्थ्यांची नांवे त्वरीत बायोमेट्रीक प्रणालीत अपडेट करून वंचीतांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रेशन बायोमेट्रीक प्रणालीत काही लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक नसल्याने त्यांची नावे अपडेट झालेली नाहीत. या अडचणींसंदर्भात पुरवठा विभागातर्फ शनिवारी बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर धान्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
अतुल सानप, पुरवठा अधिकारी; तहसिल कार्यालय जामनेर.

Web Title: marathi news jamner reshan baimatrik

टॅग्स