Vidhan sabha 2019 : गिरीश महाजनांनी आपली जामनेरची जागा टिकवावी :  जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:ची जामनेर मतदार संघाची जागा टिकवावी, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत कोणतीच कामे केली नाहीत, हे जनतेला कळालेले आहे. त्यामुळे यावेळी जनता निश्‍चितच बदल करणार आहे. निकालात हा बदल दिसून येईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला जळगाव जिल्ह्यातही चांगले यश मिळेल. त्यामुळे महाजनांच्या वक्तव्यात कोणताही दम नाही, त्यांनी आपली जामनेरची जागा टिकवली तरी पुरेसे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jayant patil girish mahajan jamner