जेईई ऍडवास्ड' 20 मेस,  27 ला हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नाशिक  : बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक बहुतांश प्रवेश परीक्षा पार पडल्या आहेत. जेईई मेन्समध्ये पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची 20 मेस जेईई ऍडवास्ड परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या परंतु परीक्षेचा अर्ज अपुरा भरलेल्या विद्यार्थ्यांनाही जेईई ऍडवास्ड देण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची सीईटी 27 मेस होईल. 

नाशिक  : बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक बहुतांश प्रवेश परीक्षा पार पडल्या आहेत. जेईई मेन्समध्ये पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची 20 मेस जेईई ऍडवास्ड परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या परंतु परीक्षेचा अर्ज अपुरा भरलेल्या विद्यार्थ्यांनाही जेईई ऍडवास्ड देण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची सीईटी 27 मेस होईल. 

  यापूर्वी झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत ऑनलाईन व ऑफलाईन पर्याय उपलब्ध होते. मात्र जेईई ऍडवास्ड परीक्षा संगणकाच्या सहाय्याने घेतली जाणार आहे. 20 मेस होणाऱ्या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुसरा पेपर दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होईल. दोन्ही पेपर देणे बंधनकारक असेल. इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व अन्य राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देत, सराव प्रश्‍नपत्रिका सोडवत विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागलेले आहेत. 

अपुरा अर्ज भरलेल्या, पात्र उमेदवारांना परीक्षेची संधी 
मुदतीत जेईई ऍडवास्ड परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण न केलेल्य परंतु जेईई ऍडवास्ड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. अर्ज अपुरा भरुनही ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची असेल, त्यांना "प्रोव्हीजनल' स्वरूपाचे प्रवेशपत्र दिले जाणार आहे. खुला गट, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा केंद्रावर 3 हजार 100 रूपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) तर एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थी तसेच सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना 1 हजार 800 रूपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) त्यांना दिलेल्या परीक्षा केंद्रावर जमा करायचा आहे. 

हॉटेल मॅनेजमेंटसाठीची सीईटी 27 मेस 
बारावीनंतर विविध शाखांतील विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी असेल. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या सीईटीला प्रविष्ठ होण्याची मुदत यापूर्वीच संपली आहे. आता 27 मेस सीईटी परीक्षा होणार असून, या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. 

सीईटी, नीट परीक्षेच्या निकालाकडे लक्ष 
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 6 मेस नीट परीक्षा झाली होती. तर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. एस्सी (कृषी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय एमएचटी-सीईटी परीक्षा गेल्या गुरूवारी (ता.10) झाली. या सीईटी परीक्षेचा निकाल 3 जून किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाणार आहे. तर नीट परीक्षेचा निकाल 5 जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागून आहे. 
 

Web Title: marathi news jee advance exam