विमानसेवा बंदचा विषय आता सोडाच, कंपनीचा दावा

live photo
live photo

नाशिक : नाशिक मधून विमान सेवा सुरु होते व दोन-तीन महिन्यातचं बंद पडते, त्यामुळे जेट कंपनीच्या वतीने सुरु होणारी दिल्ली-नाशिक हवाईसेवा निरंतर सुरु ठेवण्याच्या आग्रही मागणीला जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तितकेचं दमदार उत्तर दिले. जेटच्या वेस्ट झोनच्या सरव्यवस्थापक (सेल) रुचिका सिंग यांनी आता बंदचा विषय सोडून द्या, सेवा निरंतर कशी सुरु राहील याचाचं विचार कंपनीकडून सुरु असून उलट त्यात अधिक सेवा जोडण्याचा देखील प्रयत्न होईल त्यासाठी उद्योजकांचा पाठींबा हवा आहे. उद्योजकांनी देखील कंपनीला विमान सिट बुकींगचे ठोस आश्‍वासन दिल्याने आता राजधानी पर्यंत सुरु होणारी हवाई सेवा निरंतर चालेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने उडान योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत दिल्ली ते नाशिक (ओझर) विमासेवा येत्या पंधरा जून पासून सुरु होणार आहे. 156 सीटरचे विमानात उडान योजनेंतर्गत 40 सिटस सवलतीच्या दरात आहे. विमान सेवे बद्दल माहिती देण्यासाठी निमा कार्यालयात उद्योग व त्यांच्या संघटना प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली होती. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जेट एअरवेजच्या रुचिका सिंग, एरिया मॅनेजर याजदी मार्कर, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्टॅ चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, क्रेडाईचे अध्यक्ष सुनिल कोतवाल, ईएसडीएसचे व्यवस्थापकीय संचालक पियुष सोमाणी, दिग्विजय कपाडीया, मनिषा धात्रक, बिल्डर्स असोसिएशनचे गोपाल अटल, रामेश्‍वर मलाणी, नाशिक सिटीझन फोरमचे सुनिल भायभंग, मधुकर ब्राम्हणकर, डॉ. उदय खरोटे, हरिशंकर बॅनर्जी, एमटीडीसीचे नितीन मुंडावरे, मनिष रावळ, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, ज्ञानेश्‍वर गोपाळे आदी उपस्थित होते. 

खासदार गोडसे म्हणाले, जेट एअरवेजने नाशिककरांवर विश्‍वास ठेवल्याने त्यांना प्रतिसाद मिळाल्या शिवाय राहणार नाही. जेट एअरवेजच्या सिंग म्हणाल्या, 25 वर्षांपासून जेट एअरवेजच्या माध्यमातून सेवा सुरु आहे. कंपनी मार्फत जेथे हवाई सेवा सुरु झाली तेथे अद्यापही निरंतर सेवा आहे. नाशिक मध्ये देखील या वर्षी जोडले जात असल्याचा कंपनीसाठी महत्वाचे वर्ष आहे. नाशिककरांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. कंपनीचे एरिया मॅनेजर याजदी मार्कर म्हणाले, औद्योगिक विकास, वाईन व फुड प्रोसेसिंग युनिट तसेच धार्मिक क्षेत्रांमुळे नाशिकचे भविष्यातील महत्व ओळखून हवाई सेवा देत आहोत. नाशिककरांना मुंबई हा एकमेव पर्याय आतापर्यंत होता परंतू आम्ही आता थेट दिल्लीशी नाशिकला जोडणार असून फक्त एवढेचं नव्हे तर देशातील प्रमुख शहरे व सोळा देशांना देखील सेवा कनेक्‍ट होईल. 


जेट मुळेचं सेवा

उडान 1 योजनेत मुंबई नाशिक सेवेला प्रतिसाद न मिळाल्याने उडान 2 योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला नव्हता. हि बाब जेट एअरवेजने लक्षात आणून दिल्यानंतर मुंबई-नाशिक सेवा सुरुचं झाली नसल्याची बाब खासदार हेमंत गोडसे यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर उडान 2 योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आल्याने जेट एअरवेजचा नाशिक मधून सेवा सुरु करण्यासाठी पुर्वीपासूनचं आग्रही असल्याची बाब गोडसे यांनी सांगितली. 

तान ओझर पर्यंत देणार सेवा 
एअर डेक्कन तर्फे मुंबई-नाशिक हवाई सेवा सुरु झाल्यानंतर ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने ओझर पर्यंत प्रवाशी सेवा देण्याचा निर्णय झाला होता. परंतू एअर डेक्कनकडून प्रतिसाद मिळाला नाही. जेट एअरवेजने मात्र प्रतिसाद देत ओझर पर्यंत सेवा देणारी माहिती वेबसाईटवर तान पदाधिकाऱ्यांच्या क्रमांकासह प्रसिध्द करण्याबरोबरचं व स्थानिक पातळीवर तिकीट विक्रीचे आश्‍वासन दिले. 

उद्योजकांच्या सुचना 
- उद्योजकांबरोबरचं नागरिकांशी संवाद साधावा. 
- नाशिकचा चिवडा, वाईनचे मार्केटिंग जेटने करावे. 
- सकाळ व संध्याकाळ सेवा सुरु करावी. 
- एचएएल कडून ओझर विमानतळावर नागरिकांना प्रवेश द्यावा. 
- नाशिकच्या छोट्या व्यावसायिकांना संधी द्यावी. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com