नाशिकमध्ये शनिवारी जेके टायर्स मान्सून स्कूटर रॅली 

residentional photo
residentional photo

नाशिक : स्पोर्टस्‌क्राफ्ट आयोजित व नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टस्‌ असोसिएशन(नासा)तर्फे शनिवारी(ता.25) नाशिकमध्ये जे.के.टायर 29वी मान्सून स्कूटर रॅली होत आहे. या रॅलीत देशभरातील आघाडीच्या 41 दुचाकीचालकांनी आपला सहभाग नोंदवला असून त्यात गतविजेता वैंकटेश शेट्टी,माजी विजेता मनजीत सिंग बासन,शमीम खान,अवतारसिंग,मुझफ्पर अली व सय्यद असिफ आली यांचा समावेश असेल. भरघोष बक्षिसाच्या या रॅलीत दोन महिला चालकांनी आपला सहभाग निश्‍चित केला आहे. मुंबईची निधी शुक्‍ला व प्रिया गला यांनी गेल्यावर्षी देखील चमकदार कामगिरी बजावली होती. 

रॅलीच्या तयारीबाबत स्पोर्टस्‌क्रॉफ्टचे श्रीकांत करानी यांनी अधिक माहीती दिली. यावेळी रवी शामदासानी,मनिष चिटको,भास्कर पटवर्धन,बोबीली विजयकुमार आदी उपस्थित होते. श्री.करानी म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मान्सून स्कूटर रॅलीला लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळेच मुंबईसह,पुणे,कोल्हापूर,भोपाळ,इंदूर व इतर शहरातून चालक सहभाग नोंदवतात.

एप्रिला रेसिंग संघानेही स्पर्धेत सहभाग नोंदवला असून पिंकेश ठाकेर हा त्यांचा मुख्य चालक असेल. या रॅलीत सर्व भारतीय स्कूटर्स तीन विभागात सहभाग नोंदवतील. एस-वन टू स्ट्रोक स्कूटर्स 80 ते 110 सी.सी,फोर स्ट्रोक स्कूटर्स 80 सी सी व 210 सीसी व गट एस-टू-110 सीसी व 160 सीसी गिअर स्कूटर्स असे गट असतील. नवी मुंबईपासून दूर पहिल्यादांच या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 
पाऊस,चिखल अन्‌ चालकाचे कसब 
रॅलीचा मार्ग प्रमुख मार्ग हा विल्होळी गावाच्या पुढील बाजूस असेल. चालकांना नवी मार्ग येथे असल्याने स्पर्धात्मक विभागात चिखल(डर्ट) ट्रॅक्‍ट,पाणी साचलेल्या भांगाचा अधिक समावेश आहे. हा मार्ग पंधरा किलोमिटरचा असेल.कठीण परिस्थितीमध्ये चालकांसमोर आव्हाने असते. हे मान्सून स्कूटर रॅलीचे वैशिष्ट्य आहे असे जे.के.मोटरस्पोर्टस्‌च्या संजय शर्मा यांनी सांगितले. या रॅलीत पहिला टायमर,सर्वीत्तम महिला चालक यांनाही विशेष बक्षिसे दिली जातील. याशिवाय रोख रक्कम व चषक ठेवण्यात आला आहे.

सलग पाचव्या वर्षी टिव्हीएस रेसिंग मान्सून स्कूटर रॅलीसोबत आल्याने आम्ही उत्साहीत आहोत. आमची नवीन मशिन एनटीओआरक्‍यू एसएक्‍सआरने आयएनआरसीमध्ये चमक दाखवली. या रॅलीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर जास्तीत जास्त 50 जणांना प्रवेश देण्यात येणार होता. त्यानुसार 41 प्रवेश निश्‍चित झाले आहे. या रॅलीच्या निमित्ताने 26 व 27 छायाचित्रकारांसाठी स्पर्धा होत असून त्यातील प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ व पाचवे बक्षिस देऊन छायाचित्रकांना गौरविणण्यात येणार आहे. 

शमीम,यशचे सय्यद असिफ अलीपुढे आव्हान 
या रॅलीत यजमान नाशिकचा शमीम खान,यश पवारने नियमित सराव व अनुभवाच्या जोरावर चमकदार कामगिरी नोंदवला असून गटातील विजेतेपदाचा दावेदार असणाऱ्या सय्यद असिफ अलीपुढे त्याचे प्रामुख्याने आव्हानन असेल. नाशिकचे बदलते पावसाळी वातावरण,चिखल व डोंगराळ भागातील वळणदार रस्त्यावरून वाहन चालवतांना चालकांचे खरे कसब लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com