कबड्डी असोसिएशनतर्फे खेळाडू,संघटक,प्रशिक्षकांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

कड्डीचा स्थानिक पातळीबरोबरच राज्य,राष्ट्रीयस्तरावर प्रचार प्रसार करणारे संघटक,प्रशिक्षक तसेच आपल्या खेळाने देश गाजविणाऱ्या  खेळाडूंचा आज नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे  उत्कृष्ठ  खेळाडू,प्रशिक्षक,संघटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

कड्डीचा स्थानिक पातळीबरोबरच राज्य,राष्ट्रीयस्तरावर प्रचार प्रसार करणारे संघटक,प्रशिक्षक तसेच आपल्या खेळाने देश गाजविणाऱ्या  खेळाडूंचा आज नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे  उत्कृष्ठ  खेळाडू,प्रशिक्षक,संघटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

मनमाडला झालेल्या या कार्यक्रमासाठी समता क्रीडा मंडळाचे सहकार्य लाभले.राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक प्रकाश बोराडे, जिल्हा असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड, उपाध्यक्ष शिरीष नांदूर्डीकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, प्राचार्य डॉ आर बी भामरे, नगरसेवक कैलास गवळी, संतोष आहिरे, विनय आहेर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

  जिल्हा असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे म्हणाले, खेळाडू असला तर कबडी राहील. त्यामुळे खेळाडू महत्वाचा आहे खेळाडू तयार करण्यासाठी संघटना सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे मात्र कबड्डीचा उत्कर्ष करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी सकाळचे बातमीदार अमोल खरे यांनाही उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविले. कबड्डी क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटना, मान्यवर व्यक्ती, जेष्ठ कार्यकर्ते, आजी माजी खेळाडू, पंच, प्रशिक्षक आदींना क्रीडा पुरस्कार देण्यात आला.

    कृतज्ञता पुरस्कार आमदार पंकज भुजबळ, आमदार अपूर्व हिरे, उदय सांगळे (सिन्नर), हेमंतराव धात्रक (नाशिक), योगेश पाटील (मनमाड), हर्षद मटकर (नाशिक), बाजीराव जाधव (शिंदे), एड अरुण सोनवने (मनमाड), जेष्ठ कार्यरत संस्था समता क्रीडा मंडळ (मनमाड), उत्कृष्ठ कार्यरत संस्था पुरस्कार ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब (आडगाव), उत्कृष्ठ स्पर्धा आयोजक संस्था पुरस्कार जिल्हा परिषद (सिन्नर), जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार दिलीप सूर्यवंशी, दगडू परदेशी, आसाराम गवळी, संजय कोठावदे (सर्व मनमाड), विजय पाटील (मालेगाव), भास्कर जाधव (शिंदे), श्रीपाद हरदास (गुलालवाडी), भगवान मोरे (नाशिक रोड), उत्कृष्ठ संघटक पुरस्कार डॉ शरद शिंदे, रवींद्र घोडेस्वार, हरिभजन चावरीया, शिवाजी औरंगे, रवी बहोत (सर्व मनमाड), बाळासाहेब जाधव (ओझरमिंग), जाहिद हुसेन महंमद अली (मालेगाव), सुरेश शिंदे (आडगाव), उत्कृष्ठ व जेष्ठ पंच पुरस्कार अनिल आहिरे, राजेश डांगळे (मनमाड), उत्कृष्ठ महिला खेळाडू पुरस्कार अभिलाषा दातीर, ज्योती पवार (नाशिक), उत्कृष्ठ पुरुष खेळाडू पुरस्कार कपालेश्वर ढिकले (नाशिक), अक्षय हिरे (मनमाड), उत्कृष्ठ प्रशिक्षक पुरस्कार सुनील दराडे (मनमाड), जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार राधिका पैठणकर, चंदा तांबट, संगीता बोरसे (नाशिक), विनोद सोमासे (मनमाड), नितीन पाटील (गुलालवाडी), जेष्ठ खेळाडू पुरस्कार मोगल आहिरे, दिलीप पवार (मनमाड), क्रीडा पत्रकार पुरस्कार बब्बू शेख, नरेश गुजराथी, अमीन शेख, उपाली परदेशी, 2017 चे राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार कु ऋतुजा लभडे, मकदुम सय्यद (आडगाव) यांना पुरस्कार प्रदान केले.

29 सप्टेंबरला राजेंद्र पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय महिला पुरुष खुला गट स्पर्धां परिवर्तन सोशल अकादमी (मनमाड) तर्फे घेण्यात येणार आहे. असोसिएशनची वेबसाईट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी असोसिएशनतर्फे जाहीर करण्यात आले 

Web Title: marathi news kabadi news